जग खूप पुढे चाललंय नाही? सगळीकडे खूप स्पर्धा वाढली आहे आणि माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा Artificial Intelligence म्हणजेच AI याला महत्त्व येत चालले आहे. मला या विषयाचे एवढे आकर्षण वाटायला लागले की, माझ्या मोठ्या भावाकडून मी ते शिकायला सुरुवात केली. २०१६ मध्ये आम्ही शाळेतल्या १० मुलांच्या ग्रुपने रोबोटिक्सच्या  First Lego League  या नॅशनल लेव्हलच्या मॅचमध्ये दिल्लीला भाग घेतला होता. त्यात आम्हाला Rising Star Award मिळाल्यामुळे माझा इंटरेस्ट अजूनच वाढला. या विषयात शिकण्यासारखे ऐवढे आहे की शिकण्यासाठी आयुष्य कमी पडेल. ते शिकता शिकता याचे रूपांतर माझ्या छंदात कधी झाले हे मला कळलेच नाही.

मी सध्या Ardiouno नावाचे एक controlling board शिकत आहे. बोर्ड शिकतानाच मी त्यावर अनेक प्रकल्प करतो. ते प्रकल्प बघून माझ्या आईला, असे वाटले की याचा व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर टाकावा त्यातून मग माझे “Learn Ardiouno with fun in marathi” हे चॅनेल सुरू झाले. पहिल्याच झटक्यात मला चॅनल सुरू करून दिले खरे, पण त्याला प्रोत्साहन मात्र माझ्या वर्गातल्या मित्रांनी आणि शिक्षकांनी दिले.

अशा प्रकारे माझ्या चॅनेलसाठी अनेक व्हिडिओज बनवताना माझ्या छंदातून मला खूप आनंद मिळतो.

 - अमेय प्रमोद परदेशी

8 वी यलो हाऊस

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला