नाकाबंदी

दिंनाक: 31 Mar 2018 18:14:23


साहित्य : 3 फुगे, 1 खडू

खेळायची तयारी : हा खेळ कमीतकमी चार आणि जास्तीत जास्त कितीही जणांत खेळता येतो.

आता हा खेळ सहा मुले खेळणार आहेत.

2-2 मुलांचे गट करा.

प्रत्येक गटाला एक फुगा द्या.

फुगा फुगवा.

चला खेळू या :

दोन्ही गटातील मुलांनी भिंतीजवळ समोरासमोर तोंड करून उभं राहा.

ही मुले जिथे उभी आहेत तिथे एक रेष आखा. तिथून 29 पावलांवर आणखी एक रेष आखा.

आता गटातील समोरासमोर तोंड केलेल्या मुलांनी, फुगा आपापल्या नाकाने दोन्ही बाजूने दाबून धरा. म्हणजे फुग्याच्या दोन बाजूंनी दोन मुलांची नाकं असतील. आता फुग्याला हात लावायचा नाही.

दोन्ही मुलांनी नाकाने फुगा सांभाळत, 29 पावलं आडवं चालत जाऊन रेषा ओलांडून परत आपल्या जागेवर यायचं आहे.

दोघांची ‘आडवं चालण्याची गती व फुग्यावरचा नाक-दाब’ सांभाळत भरभर पुढे जाणं हे या खेळातलं आव्हान आहे.

नियम : दोघांनी मिळून नाकाने फुगा धरल्यानंतर, दोघांपैकी कुणीही फुग्याला हात लावल्यास तो गट बाद. फुगा जमिनीवर पडल्यास गट बाद.

कोण जिंकेल :

जो गट कमीत कमी वेळात आपल्या मूळ जागेवर परत येईल, तो जिंकला.

 

-राजीव तांबे

[email protected]