गेल्या महिन्याच्या लेखात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा देते. तुम्ही शोधलेली उत्तरं बरोबर आहेत का, ते पाहून घ्या. 

अ) या पदव्या कोणाला दिल्या गेल्या त्यांची नावं सांगायची आहेत.

बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस

कुमार गंधर्व - शिवपुत्र कोमकली

सवाई गंधर्व - रामभाऊ कुंदगोळकर

छोटा गंधर्व - सौदागर गोरे

आनंद गंधर्व - आनंद भाटे

 

ब) खाली दिलेल्या कलाकारांची नावं आणि ते कोणतं वाद्य वाजवत आहेत ते सांगा.

पं. हरिप्रसाद चौरासिया - बासरी

 

उस्ताद झाकीर हुसेन - तबला

 

पं. शिवकुमार शर्मा - संतूर

 

उस्ताद बिस्मिल्ला खाॅं - सनई


 

पं. रविशंकर आणि त्यांची कन्या अनुष्का शंकर - सतार

 

क) या काही प्रश्नांची उत्तरं ............

 लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींच्या वडिलांचं नांव काय ? - मास्टर दीनानाथ मंगेशकर

सवाई गंधर्व संगीत महोत्सव कोणत्या शहरात होतो ? - पुणें

गान सरस्वती ही पदवी कोणत्या गायिकेला दिली गेली होती ? - किशोरी आमोणकर

स्वर भास्कर ही पदवी कोणत्या गायकाला दिली गेली ? - पं. भीमसेन जोशी

ज्याच्या मल्हार रागाच्या गायनानं पाऊस पडत असे, दीपक रागाने दिवे आपोआप लागत असत असं म्हणतात. तो महानगायक कोण ? - तानसेन

हार्मोनिअम प्रमाणे काळ्या पांढऱ्या पट्ट्या असलेली आणखी वाद्यं कोणती ? -आॅर्गन, सिंथेसाइजर

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचं नाव काय ? - गांधर्व महाविद्यालय

पं. बिरजू महाराज यांनी कोणत्या प्रकारच्या नृत्यकलेचा प्रसार केला ? - कथ्थक

गायिका बेगम अख्तर, शोभा गुर्टू या कोणत्या गायन प्रकारासाठी प्रसिद्ध होत्या ? - ठुमरी, गझल ( उपशास्त्रीय संगीत )

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली नृत्य शैली कोणती ? - भरतनाट्यम्

 

आणि आता हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवरील पोवाडा...तुमच्यासाठी...

कवयित्री - मंगला पेठे           

संगीत - मधुवंती पेठे 

ऐतिहासिक महत्व असणारा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील हा पोवाडा १९८६ सालचा असल्यामुळे सदोष असण्याची शक्यता आहे. 

ऑडीओ : सावरकर गौरव गान 

अठराशे सत्तावन साली, क्रांती ती घडली भारतात । अन्याया वाचा ती फुटली हो जी जी ।।

रक्ताचे पाट वाहिले, हाणा मारा नाद निनादले । स्फुरण ते चढले, वीर ते लढले भारतात ।

अन्याया वाचा ती फुटली हो जी जी ।।

स्फूर्ती घेई तो बलवंत, रणी वासुदेव झुंजत । बंधु ते चाफेकर तीन, करिती ते रॅंड चा खून ।

क्रांतीची ज्योत पेटत, आव्हान मृत्युसी देत । हुतात्मा अवतरत भूंवरी हो जी जी।

अन्याया वाचा ती फुटली हे जी जी ।।

ज्वाळा ती या यज्ञाची भिडती आभाळा । 'विनायक' स्वये होई समिधा।

मृत्यूसी तेही जिंकुन, सोडविण्या जाती धावुन । ते अगाध राष्ट्र प्रेम ।

माय माऊलीस पूजुन, चित्तात ते समाधान। समर्पुनी स्वये जीवन ।

यज्ञात दिले झोकुन हो जी जी । अन्याया वाचा ती फुटली हो जी जी ।।

ध्येयावरी दृष्टी ठेऊन, महासागरास तरून । यातना सोशी दारुण, तळमळे कोलु फिरवून ।

शत्रूस मागे फिरवून, पाही स्वातंत्र्य डोळा भरून । शत्रूने केला पोबारा, गाशा गुंडाळून हो जी जी ।

अन्याया वाचा ती फुटली हो जी जी ।।

धन्य धन्य ते क्रांतीवीर, धन्य धन्य होई 'भगूर' । धन्य अवतार इथे घडला । गौरवे मान झुकणार ।

अमर ही गाथा इथे गाणार हो जी जी जी जी जी ।।

 

लेख २२ वा ( किशोर गटासाठी ) संगीतातील जी. के.( सामान्य ज्ञान )

 - मधुवंती पेठे