दोस्तानो, मागील लेखात आपण रंगीबेरंगी ‘फलमाधुरी‘ कशी बनवायची हे शिकलो. तुम्ही ते करून पाहिलं असेल याची खात्री आहे. या वेळी मी तुम्हांला एक सोपी पाककृती शिकवणार आहे. तर  चला, गुलाबाचं सरबत कसं बनवायचं ते शिकू या....

साहित्य:

१ किलो साखर

४०० मि. ली. पाणी

१/२ लहान चमचा सायट्रीक अॅसिड

१/४ लहान चमचा रासबेरी रंग

१/२  चमचा रोझ इसेन्स

कृती

प्रथम एक किलो साखरेमध्ये चारशे मि. ली. पाणी घालून त्यात १/२ चमचा सायट्रीक अॅसिड घालावे. ते मिश्रण एकत्र करून गॅसवर ठेवून उकळी आणावी. मग गॅस बंद करावा व मिश्रण थंड होऊ द्यावे. गार मिश्रणात रंग व इसेन्स घालावे. नंतर मिश्रण घालून बाटलीत ओतावे. सरबत देताना पाव  भाग सरबत आणि पाऊण भाग थंड पाणी अथवा दुध घालावे. की झाले सरबत तयार...! हे कामावरून दमून आलेल्या आपल्या आईबाबांना सरबत द्यावे. त्यांना खुश करायची आहे की नाही  नामी संधी..!

आईची शाब्बासकी मिळवून देणारी सोपी रेसिपी.. नक्की करून पहा.

फलमाधुरी

-प्रतिनिधी 

[email protected]