‘शिल्पकार चरित्रकोश’ आणि ‘शिक्षणविवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महामराठी भाषा प्रश्नमंजुषा स्पर्धे’चा बक्षीस समारंभ विविध शाळांमध्ये घेण्यात आला. दि. २७ मार्च रोजी व्हीजन इंग्लिश मिडीयम स्कूल, नऱ्हे या शाळेत मुख्याध्यापिका कांचन सातपुते यांच्या हस्ते बक्षीस समारंभ घेण्यात आला. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी धनंजय भांडारी आणि अश्विनी राईलकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थिनी आत्मजा खाडे हिला प्रथम क्रमांकाचे (भिलारच्या सहलीचे) बक्षीस घोषित करण्यात आले. द्वितीय क्रमांक प्राप्त प्रणोती होळकर, सायली आंबेकर यांना टी-शर्ट, तर तृतीय क्रमांक प्राप्त तनया कारंजकर, अपूर्वा भूमकर यांना पुस्तके देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कांचन सातपुते यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून ‘सर्जनशील पुनर्वापर स्पर्धे’ची माहिती सांगितली. या स्पर्धेतही घवघवीत यश प्राप्त करण्याची आशा व्यक्त केली.     

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देताना शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांना खूप आनंद झाला. या स्पर्धेतील जास्तीत जास्त बक्षिसे पटकवणारी शाळा म्हणून रमणबाग शाळेतील विद्यार्थ्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी चारुता प्रभुदेसाई यांनी केले. प्रथम क्रमांक प्राप्त वरुण कुलकर्णी आणि ईशान मोरेश्वर यांचे अभिनंदन करण्यात आले. द्वितीय क्रमांक प्राप्त ध्रुव शेठ, ओम नरवडे, यश म्हेत्रस, देवव्रत वाघ, शिवम नलावडे, चिन्मय रसाळ, दीपक मोरे, वैष्णव कदम, सोहम कुलकर्णी, श्रीधर घाडी, हर्ष जोशी, ओंकार काटकर, ऋषिकेश शिंदे यांना टी-शर्ट देऊन अभिनंदन करण्यात आले. तृतीय क्रमांक प्राप्त वेदांत बाचल, साहिल सय्यद, करण सूर्यवंशी, यश रास्ते, सोहम पांडे, मंगेश सोनो, सोहम ठिगळे, सार्थक धावडे, हर्षल मालेगावकर, उन्मेष कुलकर्णी, मिहीर देशपांडे, तन्मय कुलकर्णी, ओंकार शेळके, कौशल किखे या विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रथम क्रमांकाची भिलारच्या सहलीची संकल्पना सर्वांना आवडली. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे व पर्यवेक्षक अर्चना पंच या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


दुपारी १:३० वाजता अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स येथे विद्यार्थीनींना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात श्रावणी जाधव या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सुलभा शिंदे आणि शिक्षणविवेक कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर यांनी बक्षिसाचे वितरण केले. रेवती गांडेकर, वेदांतिका भोसले, अनुष्का थरकुडे या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक घोषित करून भिलारच्या सहलीची माहिती देण्यात आली. द्वितीय क्रमांकप्राप्त आदिती गायकवाड, राधा आपटे, श्रावणी जाधव, अनिशा चासकर यांना टी-शर्ट देऊन त्यांचे अभिनंदन केले. तृतीय क्रमांकप्राप्त गौरी झुंज, मीनाक्षी बागुल यांना पुस्तके देण्यात आली. आगामी स्पर्धांची माहिती सांगण्याचे काम उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी केले. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी मोठ्या प्रमाणात स्पर्धेत सहभागी होण्यास सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी प्रज्ञा करडखेडकर यांनी केले. 

-प्रतिनिधी

[email protected]