महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघिरे हायस्कूलच्या ११२ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महामराठी भाषा स्पर्धेचा बक्षीस समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमात मुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अभिजित तोडकर यांनी महामराठी भाषा स्पर्धेची माहिती सांगून बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसमोर नावे घोषित झाल्यामुळे बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना आनंद झाला. दिव्या सातव आणि वैष्णवी इनामके या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणजे भिलारच्या सहलीला जाण्याची संधी मिळाली. श्राविका कुरमुडे, ओमकार दुधाळ या विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांकाचे टी-शर्टचे बक्षीस देण्यात आले. अलका कारंडे आणि रणपिसे यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांना शाबासकी दिली. जान्हवी इनामके या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सानिया तांबोळी आणि साक्षी दाभाडे यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेत होणाऱ्या, तसेच शिक्षणविवेक आयोजित उपक्रमांचे फायदे सांगितले. प्रमुख पाहुण्या व शाळेतील शिक्षिका अलका कारंडे यांनी शाळेच्या परंपरेचा इतिहास कथन केला. शिवाय संस्थेने चालू केलेल्या शिक्षणविवेक मासिकाचा ‘उत्तम उपक्रम’ असा उल्लेख केला. मुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षणविवेक आयोजित आगामी स्पर्धांची माहिती सांगितली व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून महामराठी भाषा स्पर्धेचे शाळेत यशस्वी करणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी प्रमोद ठुबे आणि सुर्यगंध खैरनार यांचे आभार मानले. प्रणाली भोसले या विद्यार्थिनीने सर्वांप्रती आभार व्यक्त केले.

-प्रतिनिधी 

[email protected]