‘शिक्षणविवेक’ आणि ‘कुतूहल’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘विज्ञान नवसंकल्पना स्पर्धे’चा बक्षीस समारंभ दि. २० मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पार पडला. या शाळेतील लौकिक भिंताडे आणि अभिदत्त यन्नम या दोन विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. इ. ५वी ते ७ वीच्या गटामध्ये प्रथम क्रमांकप्राप्त water cleaner हा प्रकल्प या विद्यार्थ्यांनी केला होता. शालेय वयापासून विज्ञानाची गोडी असलेल्या या विद्यार्थ्यांना विज्ञान खेळणी देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली ठकार आणि शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प करण्याची कल्पना आणि प्रकल्पाची उपयोगिता आपल्या मनोगतातून मांडली. या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी कीर्ती घुमे आणि शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

सायंकाळी ४.३० वाजता नु. म. वि. मुलांच्या शाळेत ‘महामराठी भाषा प्रश्नमंजुषा स्पर्धे’चे  बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आले. मराठी राजभाषादिनानिमित्त ‘शिक्षणविवेक’ आणि ‘शिल्पकार चरित्रकोश’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘महामराठी भाषा प्रश्नमंजुषा स्पर्धे’त महाराष्ट्रभरातील ३५,००० विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी नु. म. वि. मुलांच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांची क्रमांकप्राप्त तर चार विद्यार्थ्यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड झाली. या विद्यार्थ्यांच्या बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन मराठी विभागाच्या आशा शिंदे यांनी केले. मराठीचे अध्यापक भरत सुरसे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती सांगितली. मानस दळवी याचा प्रथम क्रमांक आला असून पुस्तकाच्या गावाची सहल हे त्याचे बक्षीस ऐकून विद्यार्थ्यांना आनंद झाला. द्वितीय क्रमांकप्राप्त अमरनाथ दोडके याला टी-शर्ट बक्षीस देण्यात आले. सोहेल शेख, प्रथम शेडे, अभिनेता लिम्बोरे, सुमित शेडगे या तृतीय क्रमांकप्राप्त आणि उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. शिक्षणविवेक कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. ‘शिक्षणविवेक’ मासिकातील आवडणारी सदरे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितली. डॉ. अर्चना कुडतरकर यांनी स्पर्धेची निवड प्रक्रिया सांगून शिक्षणविवेक आयोजित इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. संजीवनी ओमासे यांनी शिक्षणविवेक आयोजित स्पर्धा आणि विद्यार्थ्यांना होणारा उपयोग याविषयी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे, शाळेचे पर्यवेक्षक शिवाजी कदम आणि आनंद घोलप यांनी उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांनी नु. म. वि. पद्धतीने बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-रुपाली निरगुडे

[email protected]