‘शिक्षणविवेक’ आणि ‘गमभन प्रकाशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘सांगू का गोष्ट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी राजभाषादिनानिमित्त१००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पूर्व-प्राथमिक विभागातील मोठा गट आणि प्राथमिक विभागातील इ. ३री व ४थीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेताना सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी आणि परीक्षकांनी भरपूर गोष्टी ऐकल्या. स्वत:चे नाव सांगण्यापासून ते आवाजातील चढउतार आणि हावभाव कसे असावेत; याचे उत्तम नमुने या वेळी पाहावयास मिळाले. बोधप्रद गोष्टींसोबतच स्वरचित आणि स्वत:च्या भावविश्‍वातील गोष्टींही विद्यार्थ्यांनी सांगितल्या. झाशीची राणी, शिवाजी महाराज, अकबर बिरबल, माकडमेवा, म्हातारी आणि भोपळा, साहसी ससा, श्रावणबाळ, पाण्यातील परी अशा गोष्टी ऐकणे, म्हणचे मेजवानीच होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम क्रमांकाचे दहा विद्यार्थी आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक शाळांनी मराठी राजभाषादिनादिवशी बक्षीस वितरण करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेची काही क्षणचित्रे-

 

मा. स. गोळवलकर पूर्व- प्राथमिक विद्यालयातील 'सांगू का गोष्ट' स्पर्धेच्या बक्षीस समारंभात शाला समितीचे अध्यक्ष कोटीभास्कर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी.

'सांगू का गोष्ट' स्पर्धेच्या बक्षीस समारंभात  सहभागी झालेले नु.म.वि मराठी शाळेतील विद्यार्थी सोबत शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, मुख्याध्यापिका आशा नागमोडे आणि प्राजक्ता पारेकर.   

म. न. अदवंत शाळेतील 'सांगू का गोष्ट' स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनी, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, मुख्याध्यापिका पार्वती पवार सोबत शिक्षक वर्ग .

'सांगू का गोष्ट' स्पर्धेत वा. दि. वैद्य मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी, मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी आणि जयश्री एडगावकर. 
'सांगू का गोष्ट' स्पर्धेत गोष्ट सांगताना आनंदीबाई कर्वे प्रशालेतील विद्यार्थिनी.

 'म्हातारी आणि भोपळा' ही गोष्ट सांगताना डे. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. 

 अकबर बिरबलाची गोष्ट सांगताना डे. ए. सो. प्राथमिक शाळेचा  विद्यार्थी.

 स्वामी विवेकानंद यांची गोष्ट सांगताना न्यु. इंग्लिश मेडियम पूर्व- प्राथमिक शाळेचा  विद्यार्थी.
 'सांगू का गोष्ट' स्पर्धेतील न्यु. इंग्लिश मेडियम  प्राथमिक शाळेचा सहभागी विद्यार्थी.


नवीन मराठी शाळेत 'सांगू का गोष्ट' स्पर्धेत विद्यार्थ्यांसोबत शिक्षणविवेकच्या सहसंपादक रेश्मा बाठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ आणि शिक्षक.


रानडे बालक मंदिर येथील 'सांगू का गोष्ट' स्पर्धेतील बक्षीस समारंभात मुख्याध्यापिका अमिता दाते, शिक्षणविवेक सहसंपादक रेश्मा बाठे आणि  विद्यार्थिनी.


शिशुविहार प्राथमिक कर्वेनगर येथे 'सांगू का गोष्ट' स्पर्धेसाठी परीक्षण करताना परीक्षक आणि गोष्ट सांगताना विद्यार्थिनी.


'सांगू का गोष्ट' स्पर्धेत गोष्ट सांगताना शिशुविहार पूर्व प्राथमिक कर्वेनगर शाळेतील विद्यार्थिनी.  


एस. पी. एम. इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये 'सांगू का गोष्ट' स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी.

शिशुविहार एरंडवणे शाळेत सांगू का गोष्ट स्पर्धेची बक्षीसे देताना शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आणि मुख्याध्यापिका शीतल इंगुळकर.  


मा. स. गोळवलकर प्राथमिक विद्यालयातील 'सांगू का गोष्ट' स्पर्धेच्या बक्षीस समारंभात शाला समितीचे अध्यक्ष कोटीभास्कर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी.

-प्रतिनिधी

[email protected]