फलमाधुरी

दिंनाक: 12 Mar 2018 19:43:04


दोस्तांनो, आपल्यापैकी बहुतेकांना आईच्या मागे स्वयंपाकघरात लुडबुड करण्याची जाम हौस असते. आणि आईला कामात मदत करावी असं खूप वाटतं. पण आईच्या गडबडीच्या वेळात अशी लुडबुड केलेली तिला अजिबात आवडत नाही. मग परिणाम एकच... स्वयंपाकघरातून हकालपट्टी ...काय, होतं नं असंच तुमच्या घरीही? त्यावर आम्ही एक उपाय शोधलाय.. तुम्हांला काही सोप्या पाककृती शिकवण्याचा... विश्वास नाही बसत..? पुढे वाचा तर खरं...

साहित्य:

आर्धी वाटी बारीक चिरलेले सफरचंद; १०-१२ द्राक्षं; १-१ वाटी मोसंब-संत्र; १ वाटी घट्ट गोड दही; स्ट्रॉबेरी क्रश; चवीनुसार मीठ व पिठीसाखर

कृती:

सगळी फळे साधारण बारीक चिरून घ्यावी. त्यावर चवीनुसार मीठ, पिठीसाखर, आणि स्ट्रॉबेरी क्रश घालवं. मिश्रण एकत्र करावं. मग त्यात वरून थंड दही घालावं. झाली फलमाधुरी खायला तयार.... करायला सोपी... पण आईची शाब्बासकी मिळवून देणारी रेसिपी.. मग वाट कसली पाहताय?.. या आठवड्यात होऊन जाऊ दे घरी फलमाधुरी..!

-प्रतिनिधी 

[email protected]