कलाकृती- भाग १

दिंनाक: 08 Feb 2018 15:31:03


साहित्य : रंगीत कागदाच्या पट्ट्या (2 ते 3 विरुद्ध रंग व चॉकलेटी किंवा काळा) रिकामे बॉलपेनचे रिफील (क्विलर नसल्यास) कटर, कात्री, गम, मार्कर पेन.

कृती : पेपर क्विलिंगच्या पट्ट्या असतात त्याप्रमाणे कार्डपेपरच्या पट्ट्या बनवून घ्या. साधारण एक फूट बाय 1/2 सें.मी. आकाराच्या 20 ते 25 पट्ट्या एकमेकांना एका टोकाने जोडा.

क्विलर नसल्यास रिकाम्या बॉलपेनच्या उलट्या बाजूस कटरच्या साहाय्याने पातळसा जेार देऊन क्विलरची सुई बनवून घ्या. सुईच्या आधारे सर्व पट्ट्यांची गुंडाळी करा व हळूवारपणे एका बाजूला निमुळती (टॉवर सारखी) उकलत जा. आतील बाजूस भरपूर गम ओता (Fevicol) व वाळू द्या. अशा प्रकारे एका आकाराचे दोन व अजून एक जास्त पट्ट्यांचा मोठा टॉवर बनवा. पूर्णपणे वाळू द्या.

दुसर्‍या रंगामध्ये साधारण 5 ते 10 पट्ट्यांची गोल चपटी गुंडाळी बनवा.

तीनही टॉवर्स वाळल्यावर त्यावर विरुद्ध रंगाच्या पट्ट्यांचे फ्रॉकच्या डिझाईनप्रमाणे सुशोभन करा व सर्व टॉवर्स एकमेकांना चिकटवा. (बाजूला दोन सारख्या आकाराचे व मध्ये मोठा आकार जोडा.) या तीनही आकारांना बाहेरून इतर पट्ट्यांनी जोडा व वरील बाजूस चपटा गोल उभ्या आकारात डोक्याच्या सारखे जोडा. पूर्णपणे वाळू द्या.

काळ्या किंवा चॉकलेटी रंगाच्या पट्ट्या तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. सरळ उभ्या ताणून थोडेसे हलक्या हाताने पिरगळा. कुरळ्या केसांचा आभास निर्माण होईल. सर्व पट्ट्या अशाच करून घ्या.

सर्व बाजूने चेहेरा दिसेल असा भाग सोडून केसांच्या बटा चिकटवून घ्या.

चेहेर्‍याच्या समोरील बाजूस मार्करच्या साहाय्याने चेहेरेपण काढून घ्या.

व्यवस्थित वाळू द्या. आपली कागदी बाहुली तयार.

तुमच्याकडील मिठाईचा डब्बा उघडा व चंदेरी बाजू आतमध्ये येईल असा उभा करा. त्यावर अजून छोट्या छोट्या वस्तूपण ठेवा व बाहुली बरोबर फ्रेम सारखे सुशोभन करा.

कुणाला भेट म्हणून पण देता येईल.

- अर्चना जोशी

[email protected]