छोट्या दोस्तांनो,

आता थंडी संपून हळुहळू उन्हाळा सुरू व्हायला लागेल. त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला झाडाफुलांकडे जरा नीट लक्ष देऊन पाहिलंत तर काहीतरी बदल होताना तुम्हाला दिसेल. नवीन पानं, नवीन फुलं-फळं येताना दिसू लागतील. जेव्हा खूप नवनवीन फुलं येतात, झाडं फळांनी बहरून जातात, आंब्याच्या वनांत कोकिळा गायला लागते, तेव्हा वसंत ऋतु आला, असं म्हणतात. या वसंत ऋतुमध्ये सगळीकडे आनंदी आनंद भरून राहतो. या वसंत ऋतुचं वर्णन करणारी दोन छान छान गाणी तुम्हाला देत आहे. ही गाणी ऐका. आवडली तर गाऊनही पहा.

आॅडिओ १ - ऋतु बसंत हा सुखवी सकला.     

शब्द आणि संगीत - मधुवंती पेठे

       

ऋतु बसंत हा सुखवी सकला । आनंदे या गाती बाला ।।

या वेचूया विविध फुलांना । गेहा सजवू  गुंफू माला ।।  

( गेहा म्हणजे घराला )

 

आॅडिओ २ - आला वसंत आला । आला वसंत आला ।

कवि - द. वि. गुप्ते.              संगीत - मधुवंती पेठे

           

आला वसंत आला । आला वसंत आला ।

हसवित खुलवित ही वनबाला । आला वसंत आला । ।

वनराईमधी गात कोकिळा । साथ करीत हा निर्झर आला ।

जाई जुई मोगरा बहरला । सुखवित चराचराला । आला वसंत आला ।।

हासत नाचत या फुलवेली । आमराई ही बघ मोहरली ।

ठायी ठायी नव सुमने फुलली । दावित वैभव लीला । आला वसंत आला ।।

 

दोस्तांनो, गेल्या महिन्यात मी काही प्रश्न विचारले होते. मिळाली कां त्यांची उत्तरं ?

मागील प्रश्नांची उत्तरं

१ ) ओळखा पाहू हे कलाकार .....? यांचं नांव आणि ते काय करतात....हे सांगायचंय .

 गायिका लता मंगेशकर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 गायक व संगीतकार ए. आर्. रहेमान

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गायक पंडित भीमसेन जोशी

 

 

 

 

 

 

 

 

 

तबला वादक झाकीर हुसेन

 

 

 

 

 

 

 

 

 

गायिका आशा भोसले

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

२ ) हे वादक कलाकार आणि त्यांची वाद्यं .....यांच्या जोड्या लावा

 

  १.  उस्ताद झाकीर हुसेन.                           तबला

 

  २.  उस्ताद बिस्मिल्ला खाॅं.                         सनई

 

  ३.  पं. रविशंकर.                                    सतार

 

  ४.  पं. हरिप्रसाद चौरासिया.                       बांसरी

 

  ५.  पं. शिवकुमार शर्मा                             संतूर

 

 

३ ) ही वाद्यं तुम्हाला माहीत आहे कां ?

 

     १ ) कृष्णाला वाजवायला आवडते ........... बासरी

 

     २ ) देवी सरस्वती वाजवते ......... वीणा

 

     ३ ) मीराबाईच्या हातात असते ........ एकतारी

 

     ४ ) भगवान शंकराच्या हातात असतो ........ डमरु

 

     ५ ) पोवाडा गातांना शाहीर वाजवतात ........ डफ

 

     ६ ) आदिवासी लोक नृत्य करतांना याच्या साथीने करतात ....... ढोल

 

     ७ ) घरातील शुभकार्याच्या वेळी हे मंगल वाद्य वाजवतात ...... सनई

 

    ८ ) पंढरपूरला वारीला जाणारे वारकरी हे वाद्य गळ्यात अडकवून वाजवतात ...... टाळ - मृदंग

 

    ९) लढाईवर निघालेल्या शूर मावळ्यांना उत्साह येण्यासाठी हे वाद्यं वाजवलं जायचं .... तुतारी

 

      १० ) महाभारतात लढाईच्या सुरवातीला हे वाद्य वाजवलं जायचं ........ शंख

 

लेख २१ वा ( बाल गट )संगीतातील जी के ( सामान्य ज्ञान )

 -मधुवंती पेठे

[email protected]