आपली गोड मराठी..
दिंनाक: 25 Feb 2018 15:36:47 |
आपली गोड मराठी..
आपली छान मराठी..
गोड शिरा पुरणाची पोळी..
काटेरी भजी फणसाची भाजी
तिखट उसळ रव्याची सोजी
फोडणीचे पोहे रव्याचा लाडू
खमंग चकली तुकडा पाडू
चुरचुरीत चिवडा खोबऱ्याची वडी
चवदार थालिपीठ दह्याची कवडी
मराठी मराठी भाषा माझी गोड
पिकलेल्या हापूसच्या आंब्याची फोड
मराठी मराठी नऊवारी साडी
नथीचा तोरा आणि मोत्यांची कुडी
मराठीचा फेटा आणि मराठीच धोतर
मराठीचा मी आणि मराठी माझी तर..!
मराठीचा रायगड आणि मराठी सिंधुदुर्ग..
मराठी माझी आणि महाराष्ट्र स्वर्ग ..
- सई लळीत