शिक्षणविवेक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने  आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, प्रसिद्ध लेखक अभिजित पेंढारकर यांच्या हस्ते आज सायंकाळी ४.०० वाजता स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रानडे बालक मंदिर शाळेच्या शिक्षिका पूजा अवचट यांनी ईशस्तवनाने केली.
 
पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागांतून पाच गटात निवडलेल्या उत्तम सादरीकरण केलेल्या प्रत्येकी तीन बालमित्रांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
 
आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेत पुण्यातील ३३ शाळांतील २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १८ आणि १९ डिसेंबर रोजी पुण्यातील चार शाळांच्या आवारात या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन केले होते. न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड, न्यू इंग्लिश मिडीयम स्कुल, शि. प्र.मं. मुलींची शिशुशाळा, वा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा आणि शिशुविहार कर्वेनगर या शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधींच्या सहकार्याने नाट्यछटा स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्तमरीत्या पार पडली. नोंदणी झालेल्या २०० विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थ्यांची निवड अंतिम फेरीसाठी झाली होती. विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील नाट्यछटा लेखन स्पर्धेत हिरिरीने सहभाग नोंदवला होता.
 
अंतिम फेरीत उत्कृष्ट नाट्यछटा सादर करून बक्षीस मिळवलेल्या स्पर्धक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
 गट क्र.१-  पूर्वप्राथमिक विभाग
१) शर्वरी वडनेरे (शि.प्र.मं. मुलींची शिशूशाळा)
२) आरोही उंडे (रानडे बालक मंदिर)
३) कणाद सावरकर (मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय)
उत्तेजनार्थ - अन्वी कदम (डे.ए.सो.पूर्वप्राथमिक विभाग)
 
गट क्र. २ - १ ली व २ री
१) अन्वी कुलकर्णी (डे.ए.सो.प्राथमिक विभाग)
२) प्रियल वेदपाठक (नवीन मराठी शाळा)
३) अनुष्का पाटील (प्रा.म.ना. अदवंत प्राथमिक शाळा)
 
गट क्र. ३ - ३ री व ४ थी
१) शर्व दाते (डे.ए.सो.प्राथमिक विभाग)
२) मृण्मयी वीरकर (नवीन मराठी शाळा)
३) सनद देशपांडे (शिशुविहार एरंडवणा)
उत्तेजनार्थ - अनुष्का चाफेकर (वा. दि. वैद्य मुलींची प्राथमिक शाळा)
 
गट क्र.४ - ५वी व ६वी
१) सर्वेश मांडे (मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय)
२) तन्वी केतकर (डे.ए.सो.माध्यमिक विभाग)
३) सौमित्र सबनीस (न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग)
उत्तेजनार्थ - अंकिता बादाडे (शिशुविहार विद्यापीठ)
 
गट क्र. ५ - ७ वी व ८ वी
१) सानंता तुळजापूरकर (एन.इ.एम.एस.)
२) सिद्धार्थ भंडारे (डे.ए.सो.माध्यमिक विभाग)
३) ऋतुराज कुलकर्णी (न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग)
 
स्वरचित नाट्यछटा स्पर्धा निकाल 
पालक गट - 
१. प्रथम क्रमांक - सावनी केळकर- पण ऐकेल कोण ( न्यू इंग्लिश स्कुल, रमणबाग) 
२. उत्तेजनार्थ - प्रिया माजगावकर - मोठ्ठ व्हायचं मला ( ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, निगडी) 
३. उत्तेजनार्थ - राधिका गोखले - गोष्ट ( एन.इ.एम.एस.) 
शिक्षक गट 
१. प्रथम क्रमांक - वैशाली विंचूर्णे - कट्टी बट्टी ( शि.प्र.मं. मुलींची शिशुशाळा) 
२. उत्तेजनार्थ - सौ मोनिका बोरसे - जपून वापरा पाणी ( spm मराठी माध्यम, निगडी) 
 
या वेळी तिन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांनी नाट्यछटेचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करताना अभिजित पेंढारकर म्हणाले, "लेखक म्हणून मला बोलवलं याचा मला विशेष आनंद झाला आहे. कारण संवाद लेखन या स्पर्धेचे मी परीक्षक म्हणून काम केले असल्यामुळे मला या मुलांच्या लिखाणाची, विचार करण्याची क्षमता लक्षात आली आहे. त्यामुळे मला असं वाटत की, त्यांना आता जे मिळतंय ते त्यांनी घेत राहावं, यातून त्यांचं आयुष्य आणखी समृद्ध होणार आहे, फक्त एकच एक गोष्ट न करता, वेगवेगळ्या आणि नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजेत.  यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पालकांनी मुलांवर कोणत्याच गोष्टीसाठी दबाव आणता कामा नये, शिवाय आपल्या मुलांना जास्तीत जास्त पुस्तकांच्या आणि विविध ठिकाणांच्या ओळखी करून द्याव्यात.
 
नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रकाश पारखी बोलताना म्हणाले, "आम्ही नाट्यछटा स्पर्धा घेतो, कारण या गोष्टीतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत आहे हे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या स्पर्धा घेणे आम्ही चालू ठेवले आहे. लहान वयात या स्पर्धांमधून येणारा धीटपणा त्यांना सर्वच गोष्टीत उपयोगी पडतो. फक्त पालकांनी मुलांवर प्रथम येण्याचे आणि बक्षीस मिळवण्याचे दडपण आणू नये."
 
शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले; तर रेश्मा बाठे आणि अदिती दाते यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे :


 -प्रतिनिधी