खरं म्हणजे सुदृढ शरीर, सुदृढ मन असणं हे भाग्याचं लक्षण. पण सुदृढ शरीर ही एक अशी गोष्ट आहे जी बऱ्याचदा आपल्या हातात नसते, सुदृढ मन मात्र आपण आपल्या प्रयत्नांनी बनवू शकतो.

ही एक शॉर्टफिल्म सुदृढ शरीर आणि मन याविषयी काही भाष्य करते. एक मुलगा नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत निघाला आहे, त्याची आई त्याला शाळेत सोडायला आलीय. आई मुलाच्या गप्पा सुरू आहेत ते रस्त्याने चालतायत. रस्ता क्रॉस करताना एक दृश्य समोर येत. एक आंधळा माणूस रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतोय पण कुणीही डोळस (फक्त शरीराने) असणारी माणसं त्याला मदत करायला पटकन पुढे येत नाहीयेत, शेवटी  एक माणूस त्या आंधळ्या माणसाला मदत करतो नि त्याचा रस्ता क्रॉस होतो.
 
मुलाच्या मनात याविषयीचे विचार घोळत असतात. मग मुलगा शाळेत पोहोचतो, मॅडम वर्गात येतात आणि आज सरप्राईज टेस्ट असल्याचं सांगतात. सरप्राईज टेस्टचं नाव ऐकताच सगळीकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटतात. कुणाला भीती वाटतेय, कुणाचा अभ्यास झाल्याने त्यांना भीती वाटत नाहीये. टेस्ट सुरू होते. टेस्ट आहे चित्र आणि शब्द यांच्या जोड्या लावायच्या आहेत. शब्द आहेत डोळे, आंधळा आणि चित्रांमध्ये त्याच प्रकारची चित्रं दिली आहेत. आता या मुलाला सकाळचं दृश्य आठवतं, आपण आणि आपल्यासारखी अनेक जण शरीराने धडधाकट असूनही त्या आंधळ्या माणसाला मदत करत नव्हतो हे आठवून मुलगा आंधळा शब्द आणि डोळ्यांचं चित्र यांची जोडी लावतो.
 
किती सुंदर संदेश दिला आहे पहा. अशा लोकांना डोळे दान करण्याविषयी आपण विचार आणि प्रयत्न दोन्ही करायला हवेत असा संदेश या शॉर्टफिल्म मधून दिला गेला आहे. नक्की पहा ही शॉर्टफिल्म खालील लिंकवर क्लीक करून
 
 
सौजन्य - यु ट्यूब 
-भाग्यश्री भोसेकर-बीडकर
 
 
  शारीरिक व्यंगाशी संबंधित शॉर्टफिल्म द प्रेझेन्ट