दिवाळी

दिंनाक: 08 Nov 2018 14:45:04


धनत्रयोदशी, पणती दाराशी

पुजावी तुळशी वृंदावनी!!

 

अभ्यंग स्नानाचा, दिन आनंदाचा

नरकासुराचा नायनाट!!

 

प्रेम हे अजोड, विश्वासाची जोड

पाडवा हा गोड, सौख्य दिन!!

 

भाऊ शांत छाया, बहीण ही माया

भाऊबीज आली, ओवाळाया!!

 

दिव्यांची पंगत, मिष्टान्ने संगत

सणाची रंगत, काय वर्णू?!!

 

तारका आकाशी, दिवे धरित्रीशी

उजळे प्रकाशी चराचर!!

-चारुता प्रभुदेसाई

[email protected]

ई दिवाळी अंक : दिवाळीतील अभ्यंगस्नानाचे महत्त्व सांगणारा लेख

आरोग्यदायी अभ्यंग आणि दिवाळी