द प्रेझेन्ट

दिंनाक: 25 Nov 2018 15:10:07

जन्मतः किंवा काही कारणामुळे एखाद्या व्यक्तीला/प्राण्याला शारीरिक व्यंग असणं हे मुळात त्या व्यक्तीसाठी किंवा प्राण्यांसाठी त्रासदायक असतं. पण इतरांसाठी कधी ते करूणास्पद तर कधी फक्त दोन मिनिट चुटपुटण्यासाठीचा प्रकार असतो. 
 
द प्रेझेन्ट ही शॉर्टफिल्म शारीरिक व्यंगाशी संबंधित आहे. सुरुवातीला एक मुलगा मन लावून व्हिडीओ गेम खेळतो आहे, त्याची आई येते मुलासाठी प्रेझेन्ट घेऊन. प्रेझेन्टचं खोक ठेवते, घरातले पडदे बाजूला सरकवते, 'अरे, जरा बाहेर खेळायला जा' , 'प्रेझेन्ट काय आणलंय ते तरी बघ' म्हणते, आईची टिपिकल वाक्य हो नं? त्या मुलाला आता व्हिडिओ गेममध्ये डिस्टरबन्स आल्यामुळे त्याला थोडासा राग आलाय पण आईने काय प्रेझेन्ट आणलं आहे ते पाहावं म्हणून तो खोक उघडतो तर काय!!!!!
 
त्याच आवडत प्रेझेन्ट त्या मुलाला मिळतं, कुत्र्याचं छोटसं पिल्लू. तो मुलगा त्या पिल्लाला उचलतो पण हे काय!! त्या कुत्र्याच्या पिल्लाला एक पायच नाहीये. मग मात्र त्या मुलाला आईचा राग येतो. पण ते कुत्र्याचं पिल्लू फार गोड आणि जिद्दी आहे. त्याला त्या मुलासोबत खूप खेळायचं आहे आणि त्याची ती जिद्द या मुलाला खूप भावते. शॉर्टफिल्मच्या शेवटी तो मुलगा आणि ते पिल्लू एकत्र खेळण्यासाठी तयार होतात आणि इथेच एक सरप्राईज एलमेंट आहे. ते कोणतं? ते तुम्ही  ही शॉर्टफिल्म पाहूनच ठरवा.
 
खालील लिंकवर क्लीक करून ही शॉर्टफिल्म नक्की पहा.
 
 
 
सौजन्य - यु ट्यूब 
-भाग्यश्री भोसेकर-बीडकर
 
दहशतवाद या विषयावर भाष्य करणारी शॉर्टफिल्म :