विद्यार्थी मित्रांच्या कलांना वाव देण्यासाठी आणि नाट्यछटा या मराठीतील साहित्यप्रकाराचे पुनरूज्जीवन व्हावे यासाठी ‘शिक्षणविवेक’ आणि ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय ‘नाट्यछटा स्पर्धा’ आयोजित केली आहे.

स्पर्धेसाठीचे गट आणि सादरीकरणाचा वेळ :

   पूर्वप्राथमिक विभाग   २ ते ४ मिनिटे

     • इ. १ली व २री      २ ते ४ मिनिटे

     • इ. ३री व ४थी      २ ते ४ मिनिटे

     • इ. ५वी व ६वी      ३ ते ५ मिनिटे

     • इ. ७वी व ८वी      ३ ते ५ मिनिटे.

स्पर्धेचे नियम :

 • •नाट्यछटेचा विषय वयोगटाला साजेसा व जवळचा असावा.
 • •नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाटक, कथाकथन किंवा नाट्यप्रवेश नव्हे तो स्वतंत्र प्रकार आहे.
 • विद्यार्थ्याचे पाठांतर, स्पष्ट शब्दोच्चार, सभाधीटपणा, वाचिक व अंगिक अभिनय व प्रेक्षकांचा प्रतिसाद यांस गुण दिले जातील.
 • •नाट्यछटेसाठी अनुरूप रंगभूषा व वेशभूषा केली तरी चालेल, पण त्यास स्वतंत्र गुण नाहीत.
 • •नाट्यछटा किमान वेळेपेक्षा कमी व कमाल वेळेपेक्षा जास्त असल्यास बाद होईल.
 • •स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांनी नोंदणी करताना मुख्याध्यापकांच्या सहीचे पत्र, नाट्यछटेची प्रत आणि शुल्क कार्यालयात जमा करावे.
 • •परीक्षकांचा निर्णय अंतिम असून तो स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
 • •प्रवेश शुल्क भरल्याशिवाय नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही.
 • •एकदा भरलेले प्रवेश शुल्क परत मिळणार नाही.
 • •प्राथमिक फेरीचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर लगेच जाहीर करण्यात येईल.
 • •प्राथमिक फेरीतील विजेत्यांना अंतिम फेरीत आपली प्राथमिक फेरीतीलच नाट्यछटा सादर करावी लागेल.
 • •सर्वांत जास्त विद्यार्थी सहभाग असलेल्या शाळांना विशेष पारितोषिक दिले जाईल. 

शुल्क :

नाट्यछटा सादरीकरण -

विद्यार्थी - रू. ३० प्रत्येकी.              

नाट्यछटा लेखन -

शिक्षक/पालक -

रू. २० प्रत्येकी.

 

प्राथमिक फेरी :

१८ ते १९ डिसेंबर,२०१८

अंतिम फेरी :

२५डिसेंबर, २०१८

नाव नोंदणी अंतिम तारीख : दि १०डिसेंबर, २०१८

 

स्थळ : स्वा.सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, विमलाबाई गरवारे शाळेसमोर, डेक्कन कॉर्नर, पुणे.

संपर्क : ‘शिक्षणविवेक’, मएसो भवन, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०.

०२०-२४४७०१२९, ९४०३०२६०४५.

www.shikshanvivek.com