नुसती भरकट

दिंनाक: 13 Nov 2018 14:45:19


आली आली परीक्षा

उत्सव दसर्‍यासकट 

शाळा गुंतल्या तयारीत

 मुलांची नुसती भरकट ॥१॥

 

विज्ञान मराठी अजूनही

सारे शिक्षक भिडती

ही कृती ती चाचणी बघा

मुले बघा हो रडती ॥२॥

 

गेले वर्ष पूरे सारे सुने

केवळ संपली प्रकरणे

नाही चाचणी ना उपक्रम

एकाचवेळी आता येणे ॥३॥

 

भरावयास गुण विविध

रकाणे करण्या सारे निळे

शिक्षक भिडले शिक्षणही ते

मुले बघा हो गोंधळले ॥४॥

 

नका देऊ हो झळे इतकी

बालमने हो अती कोवळी

वेळोवेळी कालांतराने

द्या कृतिपत्रिका वेळोवेळी ॥५॥

 

नाही मिळणार यातून शेरे

शक्य संभव नाही

हसत खेळत मिसळत

याहून शिक्षण नाही ॥६॥

-रणदीप बिसने

[email protected]

ई दिवाळी अंक : स्वाती देवळे यांची कथा

अतिरेकी आले घरा...