'विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रभक्त नागरिक करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे' - ज्ञानेश पुरंदरे

शिक्षणविवेक व वृंदावन फाऊंडेशन या शैक्षणिक चळवळीत सातत्याने प्रयोगशील उपक्रम राबवत असलेल्या संस्थाच्या वतीने धाराशिव व सोलापूर येथील प्रयोगशील शिक्षक-शिक्षिका यांच्यासाठी गुरुजन गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात प्रा. उषा गव्हाणे, श्री. श्रीकांत काशिद, श्री. गौतम सुतार, श्री. विष्णू सुरासे, श्री. सुरेंद्र वाले, सौ. शुभांगी गवळी-काशीद, प्रा. सत्येंद्र राऊत, सौ. लता मोरे, डॉ. प्रकाश यादगिरे, श्री, विजय भानवसे, श्री, प्रशांत जाधवर, श्री. गोपाळ कुलकर्णी, श्री. महादेव पाटील, श्री. आबासाहेब घावटे, श्री. संतोष माने, श्री, संदिपान गायकवाड, श्री. अमर सुपेकर, सौ. प्रणिता मिटकर, श्री. विनोद वायचळ, श्री. किशोर बुरंगे, श्री. शेषनाथ वाघ यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्ञानेश पुरंदरे बोलत होते, "आधुनिकतेची कास धरत प्राचीनतम भारतीय शिक्षण पद्धतीचा आदर्श नजरेसमोर ठेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणविवेक जे प्रयोग करत आहे ते स्तुत्य असून ग्रामीण महाराष्ट्रातही ते पोहोचले पाहिजे."
प्रयोगशील शिक्षक मंडळीना सन्मानपत्र, प्रमाणपत्र व ज्येष्ठ विचारवंत रमेशजी पतंगे यांची पुस्तके भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रयोगशील शिक्षक मंडळीच्या प्रत्येक शाळेतील प्रत्येकी एक या प्रमाणे २० विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृंदावन फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी मांडले. तसेच विवेक समूहाचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी शिक्षणविवेक ही चळवळ काय आहे? हे आपल्या मनोगतामधून सांगितले. अध्यक्षीय समारोप विद्याभारतीचे देवगिरी प्रांत प्रमुख शेशाद्री आण्णा डांगे यांनी केला तर आभारप्रदर्शन रामदासआण्णा कोळगे यांनी केले. निवेदन प्रा सोमनाथ लांडगे सर यांनी केले. याप्रसंगी सोलापूर व धाराशिव येथील निमंत्रित शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोदजी बाकलीकर , सतीशजी कोळगे देवीदास पाठक साहेबराव घुगे रामकृष्ण मठाचे डॉ. अनंत राजमाने, विवेकानंद केंद्राचे प्रा.श्याम दहिटनकर इ उपस्थित होते.