‘शिक्षणविवेक’ व ‘टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने

शिक्षण माझा वसा

(राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०१९)

शिक्षणाचा वसा स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक सतत कार्यरत असतात. सृजनशील अध्यापन अनुभव देणाऱ्या, उपलब्ध साधनांना तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या शिक्षकांचे कार्य विद्यार्थ्यांना दिशा देणारे ठरते. आपल्या शाळेबरोबरच इतर शाळांतही यशस्वीपणे उपक्रम घेणाऱ्या अशा उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण माझा वसा या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन आहे.

जानेवारी, २०१९ मध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत. यामध्ये ५ अध्यापन विषय (१.भाषा:-मराठी/हिंदी/इंग्रजी, २.गणित, ३.विज्ञान, ४.कला:-चित्र/नाटय/शिल्प/संगीत, ५.तंत्रज्ञान), एक उपक्रमशील मुख्याध्यापक व एक विशेष पुरस्कार अशा सात पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहेत.

 

पुरस्काराचे स्वरूप:

  रू. ५,,००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र

 

नामांकनासाठीचे निकष व नियम:

* नामांकन पाठवणार्‍या शिक्षकाचे कमाल वय ३५ वर्षे असावे.

(जन्मदाखला पुरावा आवश्यक)

* किमान ५ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.

* एका शिक्षकाने केवळ एकाच उपक्रमासाठी नामांकन पाठवावे.

* नामांकन पाठवण्याची अंतीम दिनांक : १७ डिसेंबर, २०१८

* निवड समितीचा निर्णय अंतीम असेल.

 

नामांकन पाठवण्याचे स्वरूप:

 आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे पाठवावी.

* शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.

* उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.

* वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे ३० या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा [email protected] या मेल आयडीवर पाठवावी.

संपर्क : ०२०-२४४७०१२९ / ७७०९५८७११९

-प्रतिनिधी 

[email protected]