वाचन

दिंनाक: 15 Oct 2018 19:28:55


वाचन करता पहाट उजळे नवज्ञानाची
वाचन करते घडण मानवी मनामना ची !!
वाचन आणी फिरवून साऱ्या जगतामधूनी
वाचन देते चरा चरा ची ओळख करुनी !!
वाचन आहे केवळ गुरुकिल्ली ज्ञानाची
वाचन म्हणजे प्रगल्भ जाणीव असे मनाची !!
वाचन नाही एक कुणाची मक्तेदारी
वाचन ही तर अपुली केवळ जबाबदारी !!
सुविचाराची समृद्धी हे वाचन करते
वाचन अपुल्या पूर्व दिव्य काळा ला स्मरते !!
साहित्याची गोडी सर्वा लावी वाचन
वाचन करिता सखोल होई अपुले चिंतन !!
वाचन करते संवर्धन हे चारित्र्याचे
वाचन हे तर साधन उत्तम संस्कारांचे !!
वाचानातूनी ध्येय विधायक साध्य होत से
वाचनामुळे जीवन अवघे सार्थ होतसे !!

- चारुता शरद प्रभुदेसाई
[email protected]