छोट्या दोस्तांनो,

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!

आतापर्यंत मी तुम्हाला खूप खूप नवीन गाणी दिली आणि यापुढेही देत राहणार बरं का.

पण आज मी तुमच्यासाठी एक नवीन गंमत आणली आहे. तुम्ही थोडं डोकं चालवायचं आहे आणि मी विचारलेल्या सोप्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. ही परीक्षा नाहीये बरं का... गमतीगमतीत माहिती मिळवायची आहे. तुम्हाला उत्तर माहीत नसलं तर ते माहीत करून घेण्यासाठी आई-बाबा, मित्र-मैत्रिणी कोणालाही विचारू शकता. पुढच्या लेखात मी याची उत्तरंपण देईन. म्हणजे तुमची उत्तरं तुम्हाला तपासता येतील.

तुम्हाला उत्तरं मिळाली की हेच प्रश्न तुमच्या मित्र-मैत्रिणींना विचारा....बघा कोणाकोणाला येतात ही उत्तरं...

आहे की नाही गंमत ! मग चला तर......

 

१ ) ओळखा पाहू हे कलाकार .....? यांचं नांव आणि ते काय करतात....हे सांगायचंय.

 

 

 

 

 

 


 

 

 

 


 

 

 

 


 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

२ ) हे वादक कलाकार आणि त्यांची वाद्यं यांच्या जोड्या लावा

  १.  उस्ताद झाकीर हुसेन.                           बासरी

  २.  उस्ताद बिस्मिल्ला  खाँ.                      संतूर

  ३.  पं. रविशंकर.                                    तबला

  ४.  पं. हरिप्रसाद चौरासिया.                       सनई

  ५.  पं. शिवकुमार शर्मा                             सतार

 

३ ) ही वाद्यं तुम्हाला माहीत आहे का?

 

     १ ) कृष्णाला वाजवायला आवडते ...........

     २ ) देवी सरस्वती वाजवते .........

     ३ ) मीराबाईच्या हातात असते ........

     ४ ) भगवान शंकराच्या हातात असतो ........

     ५ ) पोवाडा गातांना शाहीर वाजवतात ........

     ६ ) आदिवासी लोक नृत्य करताना याच्या साथीने करतात .......

     ७ ) घरातील शुभकार्याच्या वेळी हे मंगल वाद्य वाजवतात ......

   ८) पंढरपूरला वारीला जाणारे वारकरी हे वाद्य गळ्यात अडकवून वाजवतात ......

   ९) लढाईवर निघालेल्या शूर मावळ्यांना उत्साह येण्यासाठी हे वाद्यं वाजवलं जायचं ....

    १०) महाभारतात लढाईच्या सुरुवातीला हे वाद्य वाजवलं जायचं ........

 

काय, सोपी आहेत ना उत्तरं ? भेटू पुढच्या महिन्यात....

बालवयाला शोभणारी गाणी- भाग ६

 

- मधुवंती पेठे

[email protected]