मंत्र हा समतेचा

दिंनाक: 03 Jan 2018 14:21:23

आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिकादिन म्हणून म्हणून साजरा करतो. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देत आहोत चारुता प्रभुदेसाई यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत दिलं आहे अजय पराड यांनी आणि गीत गायन केलं आहे पद्मजा लामरुड, बिल्वा द्रविड, देवव्रत भातखंडे, संजीव मेहेंदळे या मुलांनी.  
 
 
आॅडिओ : मंत्र हा समतेचा 
 
 
मंत्र हा समतेचा 
पंथ हा जनतेचा 
दीप हा ज्ञानाचा 
उजळीला हो ||
ज्योत ही ज्योतिनी 
लाविली हो||
ज्योत सावित्री नी 
लाविली हो ||
 
अंधविश्वासाचे
निंद्य आचाराचे 
बंध हे भेदांचे 
तोडीले हो ||१||
 
दीन दुबळ्यांच्यासाठी 
आणि पददलितांसाठी 
सर्व सामान्यांसाठी 
कष्टले हो ||२||
 
कार्य सेवा भक्तीला  
ज्ञान विज्ञान शक्तीला  
मानले स्त्रीमुक्ती ला 
महात्म्यांनी||३||
 
सौ चारुता शरद प्रभुदेसाई
charutaprabhudes[email protected]