२६ जानेवारी! आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे, हे दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो. त्या मागची पवित्र भावना, देशाभिमान खऱ्या अर्थाने लक्षात घेतला पाहिजे. त्या दिवशी चौकाचौकात ध्वज उभारून भारतमाता पूजन आयोजित केले जातात. मोठ्यामोठ्याने देशभक्तीपर गीते लावून सगळा माहोल देशभक्तीमय केला जातो. पण सर्वच जण खऱ्या अर्थाने हा जाज्वल अभिमान बाळगतात का?

विद्यार्थ्यांनी अशा राष्ट्रीय दिनांच्या दिवशी १००% उपस्थिती शाळांमध्ये लावली पाहिजे. पालकांनीही आवर्जून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवलेच पाहिजे ती काही सुटी नाही!

खूप जण छोटे मोठे भिंगऱ्या लावलेले झेंडे विकत घेतात. वाहनांना लावतात, पण नंतर हे झेंडे पायदळी तुडवले जाऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. ते कुठेही, कसेही चिकटू नयेत, त्यांचा सन्मान राखवा.

राष्ट्रगीत सुरु असताना विद्यार्थ्यांनी वर्गात आणि नागरिकांनीही असेल तिथे उभे राहून मान राखावा. वर्गात काही वेळा विद्यार्थी राष्ट्रगीताला एकाग्रपणे सावधानस्थितीत उभे राहत नसतील तर ते अयोग्य आहे.

प्रतिज्ञा म्हणताना त्यातल्या प्रत्येक शब्दाप्रमाणे आचरण केले पाहिजे.

आपल्याकडून कळतनकळत भ्रष्टाचाराला हातभार लागत नाहीना, याची दक्षता घेतली पाहिजे.

अन्यायाविरुद्ध चिडून उठताना आपला राग आपण संयमानेच प्रकट केला पाहिजे, त्यातून हिंसाचार, ताणताणाव वाढायला नको.

परस्परांबद्दल योग्य तो आदर बाळगून अत्यंत सौजन्याने संवाद साधला पाहिजे.

आपली राष्ट्रीय संपत्ती आपणच राखली पाहिजे.

उदासीनता बेफिकीरी परदेशाबद्दलचे वाढते आकर्षण काढून टाकून पुन्हा एकदा आपला देशाभिमान सचोटी काट्यावर घासून पहिला पाहिजे.

भेदभाव विसरून बंधुभाव जागवण्याचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा सण आहे. सुराज्याचा तिरंगा डौलाने फडकूदे! त्यानिमित्त ही एक कविता...

 

देशभक्ती की ज्योत जलाए फिरसे

मातृभूमि को गले लगाए फिरसे||

चलो भ्रष्टता नष्ट करेंगे मिलकर

आज स्वयं को नेक बनाए फिरसे||

आतांकछाया दूर हटाए मिलकर

आज शांती का दीप जलाए फिरसे||

चलो चलेंगे साथ हम मिलकर

स्वतंत्र का अर्थ जान ले फिरसे||

भेदभाव के बंधन तोडे मिलकर

चलो एकता आज जगाए फिरसे||

स्वाभिमान से सभी रहेंगे मिलकर

अन्यायोंको नही सहेंगे फिरसे||

आज तिरंगा लहाराऐंगे मिलकर

सुराज्य को हम दोहराएंगे फिरसे||

चारुता शरद प्रभुदेसाई

 [email protected]