मित्रांनो,

आज मी तुम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. आतापर्यंत मी संगीताबद्दल निरनिराळी माहिती तुम्हाला सांगत आले होते. पण आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्यांची उत्तरं शोधायची आहेत. ही काही परीक्षा नाही बरं का. अगदी गंमती गंमतीत ही माहिती मिळवायची. नसेल माहिती तर आई, बाबा, आजी, आजोबा, मित्र, मैत्रीण कोणालाही विचारा.

स्वर्गातील देवदेवतांची करमणूक करण्यासाठी अप्सरा नृत्य करीत, यक्ष – गंधर्व गायन करीत असं तुम्ही ऐकल असेल. आणि म्हणूनच आपल्या पृथ्वीवर गायन करण्यात पारंगत व्यक्तींना गंधर्व अशी पदवी दिली जाते.

आता खाली दिलेल्या गंधर्वांची मूळ नावं तुम्ही सांगायची आहेत. म्हणजेच या पदव्या कोणाला दिल्या गेल्या त्यांची नांवं सांगायची आहेत.

  1. बालगंधर्व.  २) कुमारगंधर्व.  ३) सवाई गंधर्व.  ४) छोटा गंधर्व.   ५) आनंद गंधर्व

 

 ) खाली दिलेल्या कलाकारांची नांवं आणि ते कोणतं वाद्य वाजवत आहेत ते सांगा.

 

१)

 

 

 

 

 

 

 

 

 

२)

 

 

 

 

 

 

 

 

 

३)

 

 

 

 

 

 

 

४)

 

 

 

 

 

 

 

 

 

५)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या काही प्रश्नांची उत्तरं शोधा.   

  1. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींच्या वडिलांचं नांव काय ?
  2. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कोणत्या शहरात होतो ?
  3. गान सरस्वती ही पदवी कोणत्या गायिकेला दिली गेली होती ?
  4. स्वर भास्कर ही पदवी कोणत्या गायकाला दिली गेली ?
  5. ज्याच्या मल्हार रागाच्या गायनानं पाऊस पडत असे, दीपक रागाने दिवे आपोआप लागत असत असं म्हणतात. तो महानगायक कोण ?
  6. हार्मोनिअम प्रमाणे काळ्या पांढ-या पट्ट्या असलेली आणखी वाद्यं कोणती ?
  7. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचं नांव काय ?
  8. पं. बिरजू महाराज यांनी कोणत्या प्रकारच्या नृत्यकलेचा प्रसार केला ?
  9. गायिका बेगम अख्तर, शोभा गुर्टू या कोणत्या गायन प्रकारासाठी प्रसिद्ध होत्या ?

 

पहा बरं विचार करून... पुढच्या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पोवाड्याबरोबर या प्रश्नांची उत्तरं देईनच.

लेख २१ वा ( बाल गट )संगीतातील जी के ( सामान्य ज्ञान )

 -मधुवंती पेठे 

[email protected]