भाषिक खेळ - भाग १५

दिंनाक: 15 Jan 2018 19:12:52


‘खेळातून शिक्षण’ या संकल्पनेने आपण विद्यार्थ्यांचा भाषा अभ्यास घेऊ शकतो. अशा खेळांपैकी एक मजेशीर भाषिक खेळ म्हणजे Hot Seat Game होय. एक मुलगा फळ्याकडे पाठ करून खुर्चीत (Hot Seat) बसेल. शिक्षक किंवा वर्गातील विद्यार्थी कोणताही एक शब्द फळ्यावर लिहितील. खुर्चीत बसलेल्या विद्यार्थ्याने तो शब्द अचूक ओळखायचा आहे. तो शब्द ओळखण्यासाठी समोर बसलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्या शब्दाच्या संबंधित त्या शब्दांचे वर्णन करणारी वेगवेगळी वाक्ये त्या विद्यार्थ्याला सांगावीत म्हणजे नेमका कोणता शब्द आहे हे ओळखण्यास त्या विद्यार्थ्याला मदत होईल.

उदा.-

     ससा 

     रंग माझा पांढराशुभ्र.             

     अंग माझे कापसासारखे मऊ मऊ.  

     जंगलात मी राहतो.         

     टुणटुणू उड्या मारतो.           

 

     पोपट

     अंग माझे हिरवेगार.

     चोच माझी लाल लाल.

     पेरूची फोड आवडते फार.

     विठू विठू बोलतो छान.

 

या खेळातून मुलांची शब्दसंपत्ती वाढते. फळ्यावर लिहिलेला शब्द न पाहता वर्णनावरून ओळखण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द घेऊन विद्यार्थी हा खेळ मराठी/हिंदी/इंग्रजी या तीनही भाषेत खेळू शकतात. यातून विद्यार्थ्यांच्या भाषा विकासास चालना मिळेल.

-कल्पना आगवणे

[email protected]