भाषिक खेळ भाग- १४

दिंनाक: 14 Jan 2018 19:25:07


मुलांनी त्यांना माहीत असणारा परिचित शब्द सांगणे. त्या शब्दाशी संबंधित असलेले शब्द इतर मुलांनी सांगायचे. जसे अनेक शब्द सांगितल्यावर त्या शब्दांपासून सोपी वाक्ये तयार करता येतात. विद्यार्थी त्या शब्दाशी संबंधित शब्द आठवण्याचा प्रयत्न करतात. विचार करतात व अनेक शब्द मुले सांगतात व त्या शब्दातील अनेक शब्द किंवा काही शब्द घेऊन छोटी छोटी वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करतात. उदा.,

 

 रंग, फळे, फुले, प्रसिद्ध शहरे, मसाले पदार्थ, राज्यांची नावे, प्राणी याप्रमाणे आणखी काही शब्द देऊन त्या शब्दांशी संबंधित शब्द मुलांना लिहिण्यास सांगता येतील. असे शब्द लिहून झाल्यानंतर त्यापासून छोटी छोटी वाक्ये तयार करून घेता येतील. या खेळातून मुलांची भाषिक शब्द संपत्ती तर वाढतेच शिवाय ज्ञानरचनावादी कृतींमुळे मुले आनंदाने खेळात रममाण होतात.

-कल्पना आगवणे

[email protected]