भाषिक खेळ - भाग १३

दिंनाक: 13 Jan 2018 18:44:49


ओळख पाहू पाहुणा कोण ?

शुद्धलेखन सुधारण्यासाठी या खेळाचा/उपक्रमाचा चांगला उपयोग होतो. शब्दाचा उच्चार कसा केला आहे? याचे श्रवण व निरीक्षण विद्यार्थ्यांनी करावे. शिक्षकांनी शब्दांचा योग्य उच्चार करावा. त्या शब्दांचा उच्चार नीट ऐकून विद्यार्थ्यांनी शब्द लिहिण्याचा प्रयत्न करावा.

काना, मात्रा, वेलांटी ही प्रमाण नावे न सांगता अक्षरांना स्वरचिन्ह जोडल्यानंतर होणार्‍या शब्दांचा उच्चार लक्षात घेऊन, नकळत स्वरचिन्हांचा परिचय करून देता येईल. उदा., ‘सा’ म्हणजे ‘स + आ’, ‘स’ ला काना ‘सा’ असे काना जोडल्यावर सांगावे. त्यासाठी फ्लॅशकार्ड वापरून सराव घेता येतो. ही फ्लॅशकार्ड ‘मुळाक्षरे’ व ‘स्वरचिन्हे’ यांची असावीत. जसे... 

 

 

उच्चार जवळ असल्यास पहिली/र्‍हस्व वेलांटी किंवा पहिला/र्‍हस्व उकार. उच्चार लांब/दीर्घ असल्यास दुसरी/दीर्घ वेलांटी किंवा दुसरा/दीर्घ उकार, याप्रमाणे बदल विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील.

उदा., ‘चिमटा’ हा शब्द लिहिताना ‘चिमटा’ असा शब्द लिहिल्यास चूक की बरोबर हे मुलांनी सांगणे अपेक्षित आहे.

‘दूध’ यातील ‘दू’चा दीर्घ उच्चार करावा; म्हणजे द+ऊ=दू होईल. परंतु, ‘दू’ ला दुसरा उकारच का द्यायचा? कारण उच्चार लांबतोय. मग यात पाहुणा कोण आला? ‘ऊ’ हे मुले ओळखतील व कोणते स्वरचिन्ह जोडावे, हेही सांगतील.


 

 

 

 

 

  

 

 

 

 

याप्रमाणे सराव केल्यास उच्चार व लेखन सुधारता येते.

- कल्पना आगवणे

svapp20162gmail.com