शब्दांचा डोंगर

दिंनाक: 11 Jan 2018 19:56:48


 

अक्षर - अक्षरांच्या जोड्या लावणे. उदा., म - म , स - स याप्रमाणे ...

अक्षर - शब्द उदा., द - दसरा, दणकट, दरवाजा

                      ग - गावात, गजरा, गणपती

अक्षर - शब्द- वाक्य उदा., फ - फळ खातात - मला फळे आवडतात.

(दोन, तीन शब्दांची वाक्ये) याप्रमाणे शब्दांची वाढ करत वाक्ये तयार करणे.

 

 

 


 

 

 

 

 

 

 


 

 

 

 

 

 

अशा अक्षरावरून शब्द, शब्दावरून दोन शब्दांचे वाक्य, तीन शब्दांचे वाक्य, चार, पाच, सहा याप्रमाणे शब्दसंख्या वाढवत - वाढवत विद्यार्थी वाक्ये तयार करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल; तसेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, वाचन, लिंग यांचीही माहिती मुलांना नकळत समजेल.

या खेळामुळे विद्यार्थी विचार करून शब्दसंख्या वाढवतात व वाक्ये तयार करतात. बुद्धीला चालना देण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होतो. याप्रमाणे परिचित शब्द घेऊन अशा प्रकारचा शब्दांचा डोंगर करण्यास विद्यार्थी प्रवृत्त होतील व त्यांच्या शब्दसंपत्तीत भर पडेल.  

-कल्पना आगवणे

[email protected]