विद्यापीठ हायस्कूल, पुणे या शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी शिक्षणविवेक आयोजित ‘अंतरंगातील मी’ या कार्यशाळेचा लाभ घेतला.  दि. ४ सप्टेंबर रोजी इ. ९वीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दु.१२.०० ते ५.०० या वेळात झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिचयापासून आवड, छंद ते करिअर असा प्रवास केला. आपल्या क्षमता व करिअर यांची उत्तम सांगड घालण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. करिअरच्या उपलब्ध असलेल्या मार्गाने जाताना अजून कोणकोणत्या क्षमता जाणीवपूर्वक अंगी बाणवल्या पाहिजेत, याचा विचार या वेळी करण्यात आला. विशेष म्हणजे शाळा ३.०० वाजता सुटूनही सायं ५.०० पर्यंत थांबून  विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग दाखवला.

शाळेच्या मुख्याध्यापिका वेदपाठक यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. शिक्षणविवेक समुपदेशक मानसी भागवत यांनी कार्यशाळेची आखणी करून कार्यशाळा घेतली. शिक्षणविवेक उपक्रम प्रमुख रुपाली निरगुडे यांनी शिक्षणविवेक आयोजित स्पर्धांची माहिती सांगून विद्यार्थ्यांना लेखन करण्याविषयी आवाहन केले. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी प्रेमला बराटे व वर्षा काळे यांनी कार्यशाळेची तयारी केली. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना करिअरसंबंधीच्या अनेक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली.

-प्रतिनिधी

[email protected]