शिक्षक नसते तर...

दिंनाक: 05 Sep 2017 12:16:34


संस्कृती म्हणजे नेमकं काय? तर याच उत्तर संस्कार देण्याचे माध्यम असे आहे. भारतीय संस्कृती ही आदर्शवादी संस्काराची संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला पुज्य मानले जाते. ‘गुरू’ हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे, असे भारतीय संस्कृतीने म्हटले आहे. 

मित्रांनो, तुम्हा आम्हा सामान्य लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा गुरूंचे स्थान हे असतेच. तुम्ही म्हणाल, आम्हाला कुठे गुरू आहे? परंतु, तुम्हाला जन्म देणारे ‘माता-पिता’ तुमचे गुरूच आहेत. जे तुम्हाला समाजात वागायला बोलायला शिकवतात. आई- वडिलांच बोलणं, वागणं, चालणं, याच निरीक्षण करूनच तर आपणाला या क्रिया अवगत होतात. मग आईवडील हे आपले गुरू नाहीत, का? ते तर आपले प्रथम गुरू आहेत. आणि आपले दुसरे गुरू ते म्हणजे आपले शिक्षक, जे तुम्हाला आम्हाला ज्ञान देतात. समाजातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान हे आपणास शिक्षकांकडूनच मिळतं. ऐतिहासिक, भौगोलिक, गणिती, विज्ञानाचे ज्ञान आपणास शिक्षकच देतात. शिस्त, नम्रपणा हे सारे गुण आपल्यामध्ये अवगत करण्याचं काम शिक्षकच करतात. अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्याकडून शिक्षकच तयारी करून घेतात, असे हे आपल्याला क्षणोक्षणी मदत करणारे शिक्षक हे आपले गुरुच असतात.

मित्रांनो, निसर्ग हा सुद्धा आपला गुरू होऊ शकतो. निसर्गाकडून खूप काही घेण्यासारखे आहे. निसर्गाचाच एक घटक म्हणजे झाड. जे वय, लिंग, जात असा कसलाच भेदभाव न करता सर्वांना सावली देतं. अशा या झाडाला आपण गुरू मानलं पाहिजे व जात, लिंग यामध्ये भेदभाव केला नाही पाहिजे, अशा या निसर्गाकडून खूप काही घेण्यासारखे आहे. या निसर्गास आपण गुरू मानले पाहिजे व त्याच्याकडून घ्यायला पाहिजेत.

मित्रांनो, भारतामध्ये अनेक महान संत होऊन गेले. ते तर साक्षात देवांचे अवतार होते. परंतु, त्यांनाही जीवनामध्ये गुरू करावा लागला, काही गुरु – शिष्यांच्या जोड्या पुढील प्रमाणे. संत नामदेव महाराज यांचे गुरू विसोबा खेचर, संत ज्ञानेश्वर यांचे गुरू निवृत्तीनाथ, संत निवृत्तीनाथ यांचे गुरु संत गहिनीनाथ. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादाजी कोंडदेव.

जर निवृत्तीनाथांना गहिनीनाथ भेटले नसते, तर निवृत्तीनाथांना भागवत धर्माचा संदेश कळलाच नसता व तो निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना सांगितलाच नसता व भागवत धर्माची पताका फडकलीच नसती, तसेच नामादेवरायांना विसोबा खेचर भेटले नसते तर नामदेवरायांची भारुडे व ओव्या आपणास कळाल्याच नसत्या, याचप्रमाणे शिवाजी महाराजांना दादाजी कोंडदेवांनी शिकवलंच नसतं तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलंच नसतं.

वरील महान लोकांनी जी काही महान कामे केली आहेत. ते केवळ आणि केवळ त्यांच्या गुरुंमुळे, शिक्षकांमुळेच असा हा गुरूचा, शिक्षकांचा अपार महिमा.

गिरीष आप्पासो गुळूमकार.

म.ए.सो.कै.ग.भि. देशपांडे

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय

बारामती,४१३१०२

मो.९४२२३०३०५९.९९२२२९०९३१