चीन हा आपला शेजारी देश, पण 1962च्या युद्धापासून तो सतत भारताच्या कुरापती काढणे, भारतीय भूमीत घुसखोरी करणे, तसेच दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍या पाकिस्तानासारख्या राष्ट्रास पाठिंबा देणे, भारताविरुद्ध लढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे यांसारखी कामे करून तो भारताला त्रास देत आहे. चीनची भूमिका ही सदैव विस्तारवादी राहिली आहे. सध्या भारत-चीन सीमेवर तणावाची स्थिती आहे, पण सध्याच्या जागतिक स्थितीचा विचार करता प्रत्येक देश हा अण्वस्त्रांनी सज्ज आहे. त्यामुळे आता होणारे युद्ध हे रणभूमीवर न होता ते ‘व्यापार युद्ध’ होणार आहे.पारात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोणताही देश इतर देशांशी व्यापार करतो, तो फायद्यासाठीच करत असतो. पण भारत-चीन व्यापारात मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे.

भारत जगातील 190 देशांसोबत 640 अब्ज डॉलर्सचा व्यापार करतो. त्यामध्ये 261.1 अब्ज डॉलरची निर्यात तर 379.6 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करते. यामध्ये भारताला 118.5 अब्ज डॉलर्सचा तोटा होतो. मग हा तोटा का होतो, याचा आपण विचार करायला हवा.

भारत व चीन व्यापारात आपल्याला 52.8 अब्ज डॉलर्सचा तोटा होतो. हा तोटा रुपयांत सांगायचा झाला, तर 3556अब्ज रुपये दर वर्षी आपण चीनला भेट म्हणून देत असतो आणि याच पैशांचा वापर चीन आपल्याविरुद्ध करतो.

भारत चीन व्यापार 

भारतीय बाजारपेठांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोबाईल, इलेक्ट्रिक शोभेच्या वस्तू, वीजेच्या माळा यांचे प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये चायनीज वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आपले भारतीय उद्योगधंदे बंद होत आहेत व त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. चीनच्या वस्तू भारतीय बाजारात स्वस्त दरात विकल्या जातात. त्या स्वस्त असतात, पण भारतीय वस्तूंच्या तुलनेत निकृष्ट दर्जाच्या व लवकर खराब होणार्‍या असतात. आपण त्या वस्तू म्हणून घेतो; पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, या वस्तूंचा सर्व पैसा चीनला मिळतो. त्याचा भारताला काहीच फायदा होत नाही. उलट तोटाच होतो. त्याची काही ठळक उदाहरणे-

सन 2000 पूर्वी भारतामध्ये खेळण्यांचा व्यापार हा खूप मोठा प्रमाणात होत असे. पण, चीनी खेळणी बाजारात आल्यापासून हा खेळण्यांचा उद्योग पूर्णत: बंद पडला. परिणामी, लाखो कामगार बेरोजगार झाले. चीनची खेळणी आपल्याला दिसायला खूप आकर्षक दिसतात; पण ती तयार करण्यासाठी जे साहित्य वापरले जाते, त्यामध्ये घातक रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

चीनच्या या वस्तूंचा खेळणी उद्योगाप्रमाणेच शिवकाशीचा फटाका उद्योग, अलिगढचा कुलुप निर्मिती उद्योग, जालंधरचा खेळणी उद्योग यांसारख्या अनेक उद्योगांवर परिणाम झाला व त्यातील काही बंद पडत आहेत.

भारत-चीन व अन्य देश व्यापार

 आपल्या भारतीय वस्तू या थोड्याशा महाग असतील, पण त्या मजबूत व टिकाऊ असतात. त्या खराब झाल्या तरी दुरुस्त करता येतात, तसेच या स्वदेशी वस्तू खरेदीचा फायदा हा आपल्याच भारतीय बांधवांना होतो. स्वदेशी वस्तू खरेदीमुळे भारतीय उद्योगांना चालना मिळेल, रोजगार वाढेल. परिणामी, भारतीय अर्थव्यवस्था मजबूल होईल. हे सर्व आपणच करू शकतो.

चीनचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा 

आपले भारतीय सैनिक रणांगणावरील युद्धांसाठी सदैव सज्ज असतात. तसे आपणही चीनसोबतच्या या व्यापार युद्धासाठी सदैव तयार राहायला हवे. स्वदेशी सुरक्षा अभियानात सहभागी होण्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकतो.

आपण काय करू शकतो

  1. विदेशात तयार होणार्‍या वस्तू घ्यायच्या नाहीत, फक्त स्वदेशीच वस्तू घ्यायच्या.
  2. गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांसाठी सजावटीचे साहित्य; पणत्या; आकाशकंदील; फटाके; शोभेच्या वस्तू; माळा या भारतीय कामगारांनी, बचत गटांनी तयार केलेल्याच घेण्याचा निश्‍चय करावा.
  3. आपल्या दैनंदिन जीवनातील, मोबाईल, घड्याळ, पेन, खेळणी यांसारख्या वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत का, हे पाहूनच घ्यावे.
  4. बाजारामध्ये सध्या ‘स्पिनर्स’ हे खेळणे मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. हे चीनमध्ये तयार होते. याची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी; यासाठी त्यांनी या स्पिनर्समुळे एकाग्रता वाढते, बुद्धी तेज होते, अशा प्रकारच्या अफवा सगळीकडे पसरवल्या आहेत. या अशा अफवांना बळी पडू नये.
  5. आपण व आपल्या कुटुंबातील सर्वांनी चीनच्या वस्तू न वापरण्याचा संकल्प करावा व भारतीय वस्तू वापरण्याच्या निर्धार करावा.

 

चीनच्या वस्तू कशा ओळखाल?

  1. चीनमध्ये तयार झालेल्या वस्तूंवर ’चरवश ळप उहळपर’ असे लिहिलेले असते. किंवा झठउ (र्झीलश्रळल ठर्शिीलश्रळल ळप उहळपर) असे असते त्या वस्तू घेऊ नयेत.
  2. सर्व वस्तूंवर बारकोड छापेलेले असतात. भारतीय वस्तूंवरील बारकोडची सुरुवात 890 या अंकानी होते.
  3. चीनच्या वस्तूंवरील बारकोडची सुरुवात 690, 691, 692, 693, 694, 695 या अंकांनी होते.

यावरून चीनच्या वस्तू कोणत्या हे आपणास ओळखता येईल.

राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा म्हणजे फक्त सीमेवर जाऊन लढणे एवढेच नव्हे, तर आपल्या भारतावर होणारे चीनचे आर्थिक आक्रमण रोखणे, आपल्या बेरोजगार होणार्‍या बांधवांना अशा प्रकारे मदत करणे हीपण एक प्रकारे देशसेवाच आहे. आपण सर्वांनी या चीनच्या वस्तू न घेण्याचा संकल्प करू या व या राष्ट्रकार्यात सहभागी होऊ या...

-संकेत कुलकर्णी 

[email protected]