ठिकाण - न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर

शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०१७

वेळ – स. ८.३० ते ९.३०

       शिक्षणविवेक व रानडे बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २३ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत बालक-पालक कार्यशाळा घेण्यात आली.

आपले मुल बालवाडी शाळेतच जाते, तिथे फक्त खेळ आणि गाणी गोष्टीच घेतले जाते. अशी कल्पना बालवाडीत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची असू शकते. शाळेत फक्त मुक्त व्यवसाय घेतले जात नाहीत तर हस्त व्यवसाय, जीवन व्यवहार, भाषा कौशल्य हे अगदी सोप्या पद्धतीने त्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्याचे शिक्षण दिले जाते. यामध्ये मुलांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठी बालवाडीत प्रयत्न केले जातात. या प्रकारच्या कृती पालकांनी मुलांना जवळ बसवून करून घेतले तर पालक आणि मुले दोहोंना याच आनंद घेता येतो, याचा प्रत्यय सर्व पालकांनी बालक-पालक या कार्यशाळेत घेतला.शिक्षणविवेक समुपदेशक मानसी भागवत यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा कृती विद्यार्थी व पालकांकडून करवून घेतल्या. ६० पालक, त्यांचे पाल्य आणि शिक्षक यांनी कार्यशाळेत मनापासून सहभाग घेतला. हसत खेळत स्नायू विकास या संकल्पनेने विद्यार्थ्यांची प्रगती होते, ही गोष्ट यावेळी पालकांच्या लक्षात आली. केवळ व्याख्यान न देता कृतीवर भर देण्यात आल्यामुळे पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेला सुट्टी असूनही मुख्याध्यापिका अमिता दाते आणि सर्व शिक्षक कार्यशाळेस उपस्थित होते त्यामुळे कार्यशाळा अर्थपूर्ण झाली; असा अभिप्राय पालकांकडून मिळाला. क्ले, क्रेयॉन, कागद यांचा पसारा न होता त्यातून उत्तम कृती करता येतात. याची कल्पना पालकांना आली.

कार्यशाळेनंतर ‘शिक्षणविवेक’ व टी. बी. लुल्ला चारीटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित ‘शिकू आनंदे’ हा लघुपट दाखविण्यात आला. ज्ञानरचनावाद आणि कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित या लघुपटामुळे कार्यशाळा आणि लघुपट यांची सांगड घातली गेली.

                                                                       -प्रतिनिधी 

     [email protected]