१७ ऑगस्ट २०१७ रोजी मु. पो. तळेगाव ढमढेरे येथील प्रगती बालक मंदिरामध्ये पालक शाळा उपक्रमांतर्गत शिक्षणविवेक आयोजित पालक म्हणून घडताना ही ३ तासाची  कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी समुपदेशक मानसी भागवत यांनी पालकांना, खेळातून आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन केले. हे खेळ खेळताना पालकांमध्ये दडलेले मूल मोकळेपणाने खेळत होते.

या खेळांचे फायदे काय?, त्याचा मुलाच्या सर्वांगीण विकासावर काय परिणाम होतो? हे पालकांच्या लक्षात आले. मुळात सर्वांगीण विकास गरजेचा आहे की, फक्त अभ्यास करणे महत्त्वाचे आहे यावरही चर्चा झाली, यातूनच पालकांना सर्वांगीण विकासाचे महत्त्व लक्षात आले. मुलांची या वयाची काही वैशिष्ट्ये असतात, ती ओळखून, ती लक्षात घेऊन मुलांशी संवाद कसा साधायचा हे पालकांच्या लक्षात आले. मुलांना स्वत:चे मूल कसे ओळखावे हे कळले. मुलांच्या मागे न लागता त्यांना हसत खेळत अभ्यास आणि शिक्षण कसे देता येईल याबद्दलची माहितीही या कार्यशाळेत पालकांना मिळाली. या वेळी आरती तळवलकर व रानडे बालक मंदिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका वर्षा जोशी उपस्थित होत्या. वर्षा जोशी यांनी पालकांना गोष्ट सांगितली, त्यामुळे मुलांच्या आयुष्यातील गोष्टीचे महत्त्व आणि गोष्ट मुलांना कशी सांगावी याबद्दल पालकांना माहिती मिळाली.

या कार्यशाळेला पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

- प्रतिनिधी