मागील लेखामध्ये नकाशावाचनाकरीता नकाशा म्हणजे काय? नकाशाचे महत्त्वाचे व अविभाज्य घटक कोणते? यांची ओळख करून घेतली. या लेखाद्वारे नकाशावाचन करता महत्त्वपूर्ण असलेले नकाशाचे अंग म्हणजे दिशा ओळखता येणे. याविषयी माहिती करून घेऊ. यामध्ये नकाशावाचनामध्ये मुख्य दिशा, उपदिशा ओळखता येणे आणि दैनंदिन जीवनामध्ये दिशा ओळखता येणे याविषयी जाणून घेऊ या.

नकाशासंदर्भात विचार करता नकाशामध्ये दिशा ओळखण्यासाठी अशी एक सूचक खूण दिलेली असते. बऱ्याचदा ती नकाशातील प्रमाणरेषेच्या वरच्या बाजूस असते. यावरून नकाशातील एखाद्या ठिकाणाचे स्थान दिशासंदर्भात अभ्यासता येते. जसे की भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे किंवा सह्याद्री पर्वताची रांग भारताच्या पश्चिमेला दक्षिणोत्तर पसरलेली आहे, हे नकाशावरून आपल्याला माहीत होते. तर या खुणेने नकाशाची उत्तर दिशा दर्शवली असते. यावरून लक्षात घ्या की, नकाशा उभा टांगलेला अथवा सपाट जागी ठेवलेला असला तरी नकाशाची वरची बाजू खुणेनुसार उत्तर दिशा दर्शवते. याप्रमाणे उत्तरेकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजवीकडील दिशा पूर्व, डावीकडील दिशा पश्चिम आणि मागील दिशा दक्षिण असे हे लक्षात येते. आकृती द्वारे हे दाखवता येईल.

याव्यतिरिक्त उपदिशाही नकाशावाचनामध्ये महत्त्वाच्या असल्याने त्या अभ्यासने आवश्यक आहेत. तत्पूर्वी मुख्यदिशा व उपदिशा यांची मराठीबरोबर इंग्रजी नावे, त्यांची संक्षिप्त रूपे माहीत करून घेऊ. घड्याळाच्या काट्याच्या फिरण्यानुसार या दिशा क्रमाने दिल्या आहेत.                             

नावे संक्षिप्त रूपे

 

 

 

 

 

 

 

 

मराठीमध्ये दिशा लक्षात ठेवण्याकरता घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने ई, आ, नै, वा ही चार अक्षरे त्यांचा क्रम लक्षात घेऊन पाठ केलीत तरी दीर्घकाळ स्मरणात राहतील.

इंग्रजीमध्ये तर उपदिशा सहजरीत्या लक्षात येऊ शकतात व सांगता येऊ शकतात. कारण दिशांच्या नावामध्ये उत्तर व दाक्षिण दिशा सुरुवातीला आणि नंतर पूर्व व पश्चिम दिशा जोडून शब्द तयार झाले आहे. शिवाय त्यांच्या संक्षिप्त रूपांमधून ही NE (North-East) म्हणजेच उत्तर व पूर्व यांच्यातील दिशा ईशान्य दिशा ओळखता येते. ही आकृती अक्षरे अधिक सुस्पष्ट होईल.

 

याशिवाय नकाशावाचनामध्ये चुंबकीय सूची (Magnetic Compass)चा चारही दिशा ओळखण्यास उपयोग करण्यात येतो. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला आहात आणि तुमच्याकडे त्या ठिकाणाचा नकाशा व चुंबकीय सूची असल्यास पुढीलप्रमाणे दिशा ओळखता येतील. यासाठी पुढील कृती करा .

- नकाशा सपाट भागावर ठेवून त्याच्यावर चुंबकीय सूची ठेवा.

- चुंबकीय सूची नकाशावरील उत्तर दिशेला स्थिर होईल अशा रीतीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (उजव्याबाजूने) नकाशा फिरवा.

- सूची उत्तर दिशेला स्थिर झाल्यानंतर नक्षा फिरवणे बंद करा सूचीने दाखवलेली दिशा चुंबकीय उत्तर दिशा दर्शवते आणि नकाशा व प्रदेश यांची दिशाही दर्शवते एकदा उत्तर दिशा माहीत झाल्यानंतर यावरून मुख्यदिशा व उपदिशा ओळखणे सहज शक्य होते. दैनंदिन जीवनातही आपण ज्या ठिकाणी राहतो, ते ठिकाण शहराच्या किंवा उपनगराच्या कोणत्या दिशेला आहे, तसेच आपल्या सभोवती कोणत्या दिशेला कोणकोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी दिशा ओळखता येणे गरजेचे आहे. यासाठी आपल्यातल्या निरीक्षकाला नेहमी जागे ठेवा. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो हे तर सत्य आहे आणि याचाच उपयोग आपणांस दिशा ओळखण्यासाठी करता येतो. यासाठी सूर्याचे उगवणे मावळणे तुमच्या घराच्या कोणत्या बाजूने आहे हे लक्षात घ्या. शिवाय तुम्हाला माहीत असेलच की कोणत्याही वस्तूची सावली ही नेहमी प्रकाशाच्या विरूद्ध बाजूस असते. म्हणजेच ज्या दिशेला सूर्य उगवतो बरोबर त्याविरुद्ध बाजूस प्रकाश किरणांच्या मार्गात आलेल्या वस्तूची सावली पडेल. याचाच अर्थ पूर्वेला जर सूर्य उगवत असेल तर मध्येच असलेल्या वस्तूची सावली पश्चिमेकडे पडेल यावरून पूर्व व पश्चिम दिशांची माहिती होते. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्या उजव्या बाजूस पूर्व दिशा व डाव्या बाजूस पश्चिम दिशा असेल तर तुमच्या समोरील दिशा उत्तर व मागील दिशा दक्षिण आहे हे ओळखता येईल आणि मुख्य दिशांवरून उपदिशा नक्कीच ओळखता येतील.

रात्रीच्या वेळी देखील चंद्र, ग्रह तसेच तारका समूह यांच्या स्थितीनुसार आपल्याला दिशांचे ज्ञान होते. याकरता आपल्यातील निरीक्षकाला जागे करून चंद्राला पूर्वेला उगवणे आणि तारका समूहांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकल्याचा भास होणे यांचे निरीक्षण करा. तसेच उत्तरेकडील ध्रुवताऱ्याचे स्थान लक्षात घेऊनही मुख्यदिशा व उपदिशा ओळखता येतील.

चला, तर मग नकाशावाचनाबरोबर दैनंदिन जीवनातही दिशांचा उपयोग करून कुणी तुम्हाला एखादे ठिकाण विचारल्यास त्यांनाही दिशा दिग्दर्शन करू या.    

नकाशा वाचताना हे करायचा आहे, वाचा खालील लिंकवर.  

चला नकाशा वाचू या!

मेघना मिलिंद जाधव