मातृभाषा प्रश्नावली 

आपली मातृभाषाच ‘मराठी’ असल्याने, विचार करून शब्द, वाक्य यांची योजना करून विषय, आशय मांडणी करत नाही. तर तो आपल्या सरावाचा भाग असतो. शाळेत प्रश्न पत्रिका सोडविताना एवढे शब्द, एवढ्या प्रकारचे शब्द कसे येतील? असा प्रश्न आपणाला पडतो. शाब्दिक खेळ अनेक प्रकारचे असतात (उदा., कोडी, उखाणे, सांकेतिक भाषा) आजच्या लेखात काही शाब्दिक खेळ आपण खेळणार आहोत.

 

१) पुढे काही ‘’एक अक्षरी’’ उच्चार दिलेले आहेत ते कोणाचे आहेत ते पर्यायातून ओळखा

शब्द- १) ए २) ओ ३) वंग ४) जा ५) छू ६) छे ७) शू ८) शी ९) हं १०) हो

पर्याय- १) मानवाचे २) पशुपक्षांचे ३) अमानवीय ४) आवाज दर्शक


 

२) पुढे काही दोन अक्षरी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत शब्द सारखे तर गडबड करणारे ते या पर्यायातून शोधा.

शब्द- १)ऋकार/ रुकार २)चिर/ चीर ३)टिका/ टीका ४)दिन/ दीन ५)पुज्य/ पूज्य ६)माणिक/ माणीक ७)रुक्ष/ रूक्ष ८) शिर/ शीर ९)षष्टी/ षष्ठी १०)सुर/ सूर

पर्याय- १) वाचनातील गडबड २) मनाची अस्थिरता ३) लेखनातील गडबड ४) धांदधटपणा


 

३) पुढे काही शब्द दिले आहेत ते अर्थपूर्ण होण्यासाठी कोणते अक्षर जोडाल म्हणजे त्याचा अर्थ मजुरी किंवा त्यासाठी पैसे खर्च करणे असा होईल ते अक्षर पर्यायातून शोधा.

शब्द- १) उकरा २) खोदा ३) चराड ४) दळा ५) घुला ६) कांडा ७) घडा ८) लिखा ९) वंगा १०)शिलाड

पर्याय- १) वे २) ई ३)स ४) ला


 

४) पुढे काही शब्द दिले आहेत. त्या शब्दात कोणती कृती केल्यास नव्या अर्थाचे शब्द तयार होतील ते पर्यायातून शोधा.

शब्द- १) गज २) गत ३) गम ४) गर ५) गवे ६) गढी ७) गन ८) गया ९) गल १०) गागुं

पर्याय- १)काना वाढविल्यास २) अधिक एक अक्षर केल्यास ३) अक्षरांची उलटा पालट ४) जोड शब्द केल्यास


 

५) पुढे काही शब्द दिलेले आहेत त्यांचे स्वरूप कोणते ते पर्यायातून शोधा

शब्द- १) टकाटका २) खातखात ३) गुणगुण ४) घटाघटा ५) झुळूझुळू ६) कणकण ७) तणतण ८) पुढेपुढे ९) मणमण १०) मुळूमुळू

पर्याय- १) अंती ‘उ’ स्वर २) सर्व शब्द समान अर्थी ३) जोडाक्षर शब्द ४) पुनरुक्ती शब्द


 

६) पुढे ‘मराठी’ महिन्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्या पैकी ‘वसंत’ ऋतू कोणत्या ठिकाणी येईल तो क्रमांक उत्तराच्या चौकटीत लिहा.

१)चैत्र- वैशाख २) जेष्ठ- आषाढ ३)श्रवण- भाद्रपद ४)अश्विन- कार्तिक ५) मार्गशीष- पौष ६)माघ- फाल्गुन


 

७)पुढे काही घटना दिलेल्या आहेत. एक गोष्ट निश्चित होते ती कोणती ते पर्यायातून शोधा

शब्द- १) मतभिन्नता २) वादावादी ३) भांडण ४) मारामारी ५) व्दंव्द ६) युद्ध ७)लढाई ८) यादवी ९)महायुद्ध

या सर्वांचे कारण

पर्याय- १) संघर्ष २) घर्षण ३) आश्ष्टि ४) अपेष्टा


 

८) पुढे काही ‘तिथी’ विशेष गोष्टी दिलेल्या आहेत त्या शब्दांवरून ती तिथी पर्यायातून ओळखा.

शब्द- १)हनुमान जयंती २) बुद्ध जयंती ३) वड पूजन ४) गुरु पूजन ५) रक्षाबंधन ६) कोजागिरी ७)गुरुनानक जयंती ८) दत्तजयंती ९)शाकांबरी उत्सव १० ) होळी उत्सव

पर्याय- १) अमावस्या २) पौर्णिमा ३) चतुर्थी ४) अष्टमी


 

९) पुढे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांबाबत कोणती कृती केल्यास अक्षर, शब्द, अर्थ यात बदलच होत नाही. ते पर्यायातून शोधा

शब्द- १) कनक २) कडक ३) कलंक ४) ५) कणिक ६) काका ७) जलज ८) जहाज ९) टोमॅटो १०)डफड ११) नयन १२) नमन १३) गणंग १४) नर्तन १५) नंदन १६) नवीन १७) दादा १८) मध्यम १९) मामा २०) मलम २१) धनांध २२) वटाव २३) वळीव २४) रबर २५) तब्बेत २६) तुरंत २७) दादा २८) सकस २९) सर्कस ३०) समास

पर्याय- १) प्रत्यय जोडून २) विरूद्ध अर्थी शब्द लेखन ३) अक्षराची उलटापालट करून ४) अक्षर अक्षर संख्येची समानता आणून


 

१०) पुढे काही ‘ विशेष नामे’ दिलेली आहेत, त्या जोडीतील नाते दिलेल्या पर्यायातून ओळखा

शब्द- १) कृष्ण+राधा २) गणेश+शारदा ३) जवाहर+कमला ४) मोतीलाल+स्वरुपाराणी ५) राम+सीता ६) राजीव+ सोनिया ७) रावण+मंदोदरी ८) लक्ष्मण+ उर्मिला ९) विष्णु+ लक्ष्मी १०) शिव+ पार्वती

पर्याय- १) बंधू-भगिनी २) दीर-भावजय ३) पिता-कन्या ४) पती-पत्नी


 

११) पुढे काही दोन अक्षरी शब्द दिलेत ते शब्द देत असतांना दुसरे अक्षरच गायब झाले दिलेल्या पर्यायातून एक अक्षर असे निवडा ते अक्षर जोडताच सर्व शब्द अर्थपूर्ण होतील.

शब्द- १)अ--- २)आ--- ३) ख--- ४) गुं--- ५) चं--- ६) ज-- ७) टां--- ८) ठ--- ९) ड--- १०) ढ-- ११) ता--- १२) दं— १३) न--- १४) पों--- १५) बा--- १६) भा--- १७) मृ--- १८) यु--- १९) रं--- २०) लिं--       पर्याय- १) ग २) गा ३) गि ४) गो


 

१२) पुढे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे वैशिष्ट्य दिलेल्या पर्यायातून ओळखा

शब्द- १)अधोवदन २) अघस्थळ ३) तेजोनिधी ४) तिरस्कार ५) दुर्जन ६)दुष्कृत्य ७)नमस्कार ८)पुरस्कार ९) भास्कर १०) मनोरथ

पर्याय- शब्द १) विसर्गसंधी २) स्वरसंधी ३) व्यंजनसंधी ४)दिर्घत्वसंधी


 

१३) पुढे काही प्राणी-पक्षी यांचे आवाज (नावे) दिले आहेत त्या पैकी अशा प्राण्यांचा आवाज ओळखा की ज्याचे आपण लाड हि करतो व हाड हाड ही करतो

शब्द व पर्याय

१) चित्कार २) भुंकणे ३) केकाटणे ४) कलख ५) म्यॅाव म्यॅाव ६) डरकाळी ७)हंबरणे ८)चिवचिव ९) कोल्हेकोई १०)चिवचीव ११) किलबिल १२) कुहूकुहू


 

१४) पुढे काही शब्द दिले आहेत त्या शब्दांचे पर्यायातून वैशिष्ट्य ओळखा

शब्द- १) आध्यात्मिक २) आनुवंशिक ३) ऐतिहासिक ४) औद्योगिक ५) सैनिक ६) सांसारिक ७)जैविक ८) तौलोनिक ९) तात्कालीक १०)दैनिक ११) धर्मिक १२) नागरिक १३) पौराणिक १४) भौमितिक १५) भौगोलिक १६) मानसिक १७) वैदिक  १८) वैचारिक १९) शारीरिक २०) पारंपारिक

पर्याय- १) पुल्लिंगी शब्द रचना २) विषयाधिष्ठित शब्द रचना ३) वर्णक्रमाने मांडणी ४) ‘इक’ प्रत्यय शब्द मांडणी;


 

१५)वर्ण मालेच्या एका ‘’वर्गातील’’ अक्षरातील काही शब्द दिले असता दुसऱ्याच ‘वर्गातील’ काही शब्दांनी त्यात घुसखोरी केली त्या अक्षराचा दिलेल्या पर्यायातून शोध घ्या.

शब्द- १) तपास २) टकमक ३) ताडगुळ ४) तीर्थ ५) टाकाऊ ६) थंडगार ७) थालीपीठ ८) थील्लर ९) दसभुजा १०) दानपात्र ११) टिकली १२) देवी १३) धट्टाकट्टा १४) धांदल १५) धिरेधिरे १६) टेंबा १७) नक्षत्र १८) ठोकळा १९) नांगर २०) नोटीस

पर्याय-

वर्ग- १) ट २) त ३) प ४) क

 

भालचंद्र अंबादास घारे 

[email protected]