शिक्षण विवेक आणि आनंदीबाई कर्वे प्रशाला, पुणे - प्रमुख वक्त्या डॉ सुजाता तेताली, मुख्याध्यापिका सविता रानडे

महाराष्ट्र हा कृषिप्रधान देश आहे. शालेय विद्यार्थ्यांना कृषीचे महत्त्व लक्षात यावे आणि शेतीविषयी माहिती मिळावी यासाठी आनंदीबाई कर्वे प्रशालेत महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. दि. १ जुलै रोजी सकाळी १० ते ११ या वेळात झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी शाळेच्या आवारात झाड लावले. मुख्याध्यापिका सविता रानडे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र कृषिदिन व वृक्ष लागवड उपक्रम यांचा संबंध सांगितला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शास्त्रज्ञ डॉ. सुजाता तेताली यांनी विद्यार्थिनींना शेतीविषयक माहिती सांगितली. शेतीच्या पूर्वीच्या पद्धतीपासून आत्तापर्यंतच्या पद्धतींची माहिती पॉवरपोइंट प्रेझेन्टेशनच्या मदतीने दाखवली. वेगवेगळ्या जातीच्या, रंगांच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी सापडणाऱ्या अनेक वनस्पतींची चित्रे या वेळी विद्यार्थिनींना पाहायला मिळाली. विद्यार्थिनींशी गप्पा मारत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत एक तासाचा कार्यक्रम छान पार पडला. शिक्षणविवेकच्या उपक्रम प्रमुख रुपाली सुरनीस-निरगुडे यांनी शेतीविषयक प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या ‘भातलावणी’ उपक्रमाची माहिती सांगितली. शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी प्राजक्ता वैद्य यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतरही विद्यार्थिनींनी डॉ. तेताली यांना अनेक प्रश्न विचारले. स्वतः शास्त्रज्ञ असून वनस्पतीविषयक अभ्यास करणाऱ्या डॉ. तेताली यांनी विद्यार्थिनीच्या शंकांचे निरसन केले.

[email protected]