हास्यचित्रकार

दिंनाक: 29 Jul 2017 15:43:06

 

शि. द. फडणीस

फडणीस, शिवराम दत्तात्रेय 

हास्यचित्रकार 

२९ जुलै १९२५ 

 शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील भोज या छोट्या खेडेगावी झाला. तेथे मिळेल तेवढे शिक्षण घेऊन फडणीसांनी कोल्हापुरात स्थलांतर केले. तेथून १९४४ साली ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी तेथून १९४९ मध्ये उपयोजित कला पदविका (जी. डी. आर्ट, कमर्शिअल) प्राप्त करून घेतली. मुंबईचे हवामान आणि जीवनशैली आपल्या शरीरप्रकृतीला मानवात नसल्याचे अनुभवाला आल्यावर काही काळ कोल्हापुरात फडणीसांनी आपला स्टुडिओ थाटला आणि नंतर अनंत अंतरकरांच्या प्रेरणेने पुण्याला स्थलांतर केले व ते कायमचे पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे पुण्यासारखे अधिक विस्तृत क्षेत्र त्यांच्या कलेला उपलब्ध झाले. 

फडणीसांच्या हास्यचित्रांतील प्रसंग सर्वसामान्य मध्यमवारफिया गृहस्थांच्या आयुष्यात सतत येत राहणारे आहेत. अशा प्रसंगांचा अडचणींचा खिलाडूपणाने सामना करणाऱ्या नायक - नायिकांशी सर्वसामान्य रसिकांची नदी जुळते व पाहताक्षणी गुदगुल्या झाल्याप्रमाणे त्यांची हसून प्रतिक्रिया व्यक्त होते, प्रसन्न वातावरण निर्माण होते.     

- वसंत सरवटे 

शिल्पकार चरित्रकोशातून साभार 

(पूर्ण माहितीसाठी पाहा - दृश्यकला खंड)