‘डॉजबॉल’ 

मित्रांनो, ‘क्रीडांगण’ या नव्या सदरामध्ये तुम्हाला दर महिन्याला एका मैदानी खेळाची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामध्ये त्या खेळाचा इतिहास, नियम, मैदानाची मापे, खेळाडू याबाबत सविस्तर माहिती असेल. खेळ खेळताना तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. या सदरात प्रथम ‘अमेरिकन मारचेंडू’ (American Dodge Ball) या खेळाविषयी माहिती घेणार आहोत.

संपूर्ण भारतामध्ये कमी वेळेत लोकप्रिय होत असलेल्या ‘डॉजबॉल’ या खेळाचा शोध 600 वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये झाला होता. त्यानंतर हा खेळ युरोपकडून अमेरिकेपर्यंत पोहोचला व तेथे या खेळाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली आणि हा खेळ अमेरिकन खेळ म्हणून प्रसिद्ध झाला. डॉजबॉल हा खेळ शाळांमध्ये मनोरंजन पद्धतीने खेळला जातो. हा खेळ खेळल्याने शारीरिक क्षमतांचा विकास होतो. जसे - चपळता, संतुलन, एकाग्रता, गती, डोळे- बॉल हातांचा समन्वय, अचूकता आणि हातांची शक्ती इ. विकास होतो.

भारत हा दुसरा आशियाई देश आहे की, ज्याला आंतरराष्ट्रीय डॉजबॉल फेडरेशनने मान्यता प्रदान केली आहे. भारतामध्ये पहिली राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा ही सिनियर गटामध्ये फक्त पुरुषांसाठी चंदिगड येथे 2005 मध्ये झाली. सन 2007 साली महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रीय पातळीवर डॉजबॉल पुरुष व महिलांची अजिंक्यपद स्पर्धा अमरावती येथे 14 नोव्हेंबर 2007 रोजी झाली. आज संपूर्ण भारतातील जवळपास सर्व राज्यांना भारतीय डॉजबॉल संघटनेने मान्यता दिली आहे. सर्व राज्यांमध्ये हा खेळ प्राथमिक स्तरापासून सब ज्युनिअर, ज्युनिअर, तसेच वरिष्ठ गटांमध्ये पुरुष व महिला स्पर्धांचे आयोजन करून खेळल्या जात आहे.

डॉजबॉल मैदान आकृती

1.अंतीम रेषा (End Line –A To A1, B To B1)

2.आक्रमक रेषा (Attack Line-C To C1, D To D1)

3.अंतीम रेषा (Dead Line-E To E1, F To F1)

4.मध्य रेषा (Imaginary Center Line-G To G1)

 1. Ball S-H and H1
 2. Net Line-I To I1,J To J1

7.The out Players 1,2,3,4 (substitute players will stand behind this line.)

 1. सरपंचReferee - R
 2. गुणसंख्या Scorer -S

10.वेळाधिकारी Timekeeper - T

 1. पंचUmpire - U
 2. Posts - (K,K1,/L, L1/M,M1/N, N1)

 मैदान :

डॉजबॉल खेळाचे मैदान आयताकृती असते.

मापे :

1) सब ज्युनिअर - मुले : 14 मीटर * 9 मीटर (लांबी*रुंदी)                                                       मुली : 12 मीटर * 9 मीटर   

2) ज्युनिअर - मुले : 16 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)

           मुली : 14 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)

3) वरिष्ठ गट — पुरुष : 18 मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)

         महिला : 16मीटर * 9 मीटर (लांबी * रुंदी)

 1. चोहोबाजूंनी5 मीटर फ्री झोन एरिया असतो.
 2. मध्यरेषेपासून दोन्हीकडे समान अंतरावर0.5 मीटर अंतर सोडून डेड लाईन आखण्यात येते. त्याला डेड झोन म्हणतात.
 3. मध्यरेषेपासून दोन्हीकडे समान अंतरावर-

पुरुषांसाठी : 3.05 मीटर.

महिलांसाठी : 2.00 मीटर

ज्युनिअर मुलांसाठी : 3.00 मीटर

ज्युनिअर मुलींसाठी = 1.5 मीटर

सब ज्युनिअर मुलांसाठी : 2.00 मीटर

सब ज्युनिअर मुलींसाठी : 1.00 मीटर

एक आक्रमक रेषा असते. त्या रेषेमागून आक्रमण करतात.

 1. मध्यरेषेवरच दोन्ही बाजूच्या साईड रेषेपासून आतमध्ये3. मीटरच्या अंतरावर एक एक गोल आखण्यात येतो, ज्यामध्ये सामन्याच्या सुरुवातीला बॉल ठेवण्यात येतात.
 2. मैदानाच्या प्रत्येक रेषेची रुंदी2 इंच असते.
 3. रेषेची रुंदी मैदानाच्या मापामध्ये समाविष्ट असते.
 4. मध्यरेषेला फ्री झोन एरियाच्या रेषेपर्यंत वाढवण्यात येते.
 5. सर्व साईड रेषेला नेटपर्यंत काही अंतर सोडून आणण्यात येते.
 6. खेळाचे मैदान-खेळाचे मैदान म्हणजे तो एरिया,जो अंतिम रेषा आणि साईड रेषा व आक्रमक रेषेच्या मधील भाग असतो.

* नियम :

 1) खेळाडू : एका संघामध्ये 10 खेळाडू असतात. त्यांपैकी 6 खेळाडू मैदानामध्ये खेळतात. उर्वरित 4 पर्यायी खेळाडू हे अंतिम रेषेबाहेरून बॉल देण्यास सहकार्य करतात.

2) मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल पर्यायी खेळाडूनेच मुख्य खेळाडूंना पास करणे आवश्यक आहे.

 1. आक्रमक रेषेवर किंवा न्युट्रल झोनमध्ये पडलेला बॉल पर्यायी खेळाडू उचलून आपल्या मुख्य खेळाडूला देऊ शकतो.
 2. सामना हा बेस्ट ऑफ थ्री सेटचा असून,त्यापैकी 2 सेट जिंकणारा संघ विजयी. प्रत्येक सेट हा 8 मिनिटांचा असतो. 3. मिनिटांचा मध्यान्ह असतो.
 3. प्रत्येक सेटनंतर मैदान बदलते.
 4. मुख्य खेळाडूंनी मैदानाच्या आत असताना कोणत्याही साईड रेषेला स्पर्श करू नये.
 5. सामना अधिकारी: एक सरपंच, एक पंच, एक वेळाधिकारी, एक गुणलेखक, दोन रेषापंच असे एकूण सात अधिकारी असतात.
 6. टाईम आऊट: सामन्याच्या दरम्यान (Official) टाईम आऊट व्यतिरिक्त इतर कोणताही टाईम आऊट नसतो.
 7. खेळाडू बदलणे: सामन्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा खेळाडू बदल दिला जात नाही. खेळाडू बदलण्याची परवानगी सेट संपल्यानंतरच दिली जाऊ शकते.

 नाणेफेक :

 1)जो कर्णधार नाणेफेक जिंकतो, त्याला केवळ मैदान निवडता येते.

2) पायाने चेंडू मारण्याची/फेकण्याची परवानगी नाही.

3) मध्यरेषेवरून चेंडू पकडल्यानंतर लगेच तीन सेकंद किंवा जास्तीत जास्त पाच सेकंदामध्ये चेंडू विरुद्ध खेळाडूला मारावा.

गुण :

1) ‘अ’ संघातील कोणत्याही खेळाडूने फेकून मारलेला चेंडू जर ‘ब’ संघातील कोणत्याही खेळाडूला लागला तर ‘ब’ संघाचा तो खेळाडू आऊट होऊन ‘अ’ संघास एक गुण प्राप्त होतो.

2) चेंडू हा बाहेरील कुठल्याही साहित्यास, तसेच जमिनीला न लागता सरळ खेळाडूला लागला पाहिजे.

3) खेळाडूद्वारे मारलेला चेंडू विरुद्ध संघाच्या खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागास लागल्यास तो बाद होतो.

4) चेंडू फेकताना बचावात्मक वेळी खेळाडू साईड रेषेला, आक्रमक रेषेला व अंतिम रेषेला स्पर्श करू शकत नाही. जर स्पर्श झाला, तर खेळाडू बाद होतो आणि विरुद्ध संघास गुण प्राप्त होतो.

5) एका संघाचे सर्व (सहाच्या सहा) खेळाडू बाद झाले, तर विरुद्ध संघास 6 गुणांसोबत 2 अतिरिक्त गुण बोनसच्या रुपात दिले जातात.

अशा प्रकारे इतरही अनेक छोटे छोटे नियम या खेळात आहेत. प्रत्यक्ष खेळताना हे सर्व नियम समजून घेता येतात.

- रोहीदास भारमळ, मुख्याध्यापक

 म.ए.सो. मुलांचे विद्यालय