ozone layer (ओझोन लेयर)
होय मुलांनो, ओझोनचा एक रेणू फक्त तीन प्राणवायूच्या अणूंचा मिळून तयार झालेला असतो, पण तो मानवासाठी कसे महान कार्य करतो ते आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त पाहू या. 
 
इतिहास: 
सर्व प्रथम ओझोनचे अस्तित्व डच अभ्यासक व्हॅन मारुम (Van Marum) याला विद्युत उपकरणाच्या जवळ येणाऱ्या वासावरून लागला. पण नंतर जर्मन शास्त्रज्ञ शोबाईन (Shobein) याने १८४० मध्ये या वासावर अधिक संशोधन केले. त्याच्या व सेंद्रिय पदार्थांच्यात होणाऱ्या रासायनिक क्रियांचा आधिक अभ्यास केला. म्हणून शोबाईनला ओझोनचे अस्तित्व सिद्ध केल्याचे श्रेय दिले जाते. अजूनसुद्धा ओझोन, ओझोनचा वातावरणातील थर, त्यात काळानुसार होणारे  बदल, मानवी, प्राणी, वनस्पतीं यांच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर संशोधन चालले आहे. १९९५ चे रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक, कर्तझन (Crutzen) मोलिना (Molina) व रोलॅन्ड (Rowland) या तिघांना मिळाले. ओझोनच्या थराला दक्षिण ध्रुवांवर  पडलेलं  भोक १९९५ मध्ये फ़ार्मर (Farmar), गार्डिनर (Gardiner) व शॅन्कलीन (Shanklin) यांनी शोधलं. त्यामुळे समाज तुम्हा मुलांकडे भविष्यातील संशोधक म्हणून पाहत आहे. या सिंहावलोकानावरून आता  प्रत्यक्ष शास्त्राकडे वळू या. प्रथम वातावरणाची रचना पाहू या. 
 
वातावरणाची रचना 
वातावरणात खाली दिलेले काही गोलाकार आवरणे असतात. 
१) ट्रोपोस्फियर : यात सर्व वातावरणापैकी ७५% वस्तुमान (मास) असते. याची उंची अक्षांशवर अवलंबून असते. विषुववृत्तावर ती १६ कि. मी. असते तर ध्रुवावर ८ कि. मी. असते. हा गोल विमानाच्या प्रवासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. विषुववृत्तावर खूप उष्णतेमुळे वादळे होत असतात. 
२) स्ट्रॅटोस्फियर : या गोलात वातावरणातील ओझोन खूप मोठ्या प्रमाणात असतो. पोलवर या गोलाची जाडी सगळ्यात जास्त असते, पण विषुववृत्तावर नसते. याची घनता २२ कि.मी.वर उंचीवर महत्तम असते. 
३) मेसोपोफियर : हा स्ट्रॅटोस्फियरच्यावर असतो याचे दोन भाग असतात. खालचा थंड असतो तर वरचा उष्ण असतो. याची जाडी एकूण १३० कि.मी. असते. 
४) थर्मोस्फियर : या गोलात मुख्यतः नायट्रोजन व ऑक्सिजन असतात. हा उष्ण गोल आहे कारण सूर्याचे किरण १००० ते १७०० पर्यंत तापमान असते. 
५) आयनोस्फियर : या गोळ्याचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ एडवर्ड अपलटन (Edward Appleton) याने लावला. हा किराणा मार्फत दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. 
 
ओझोनची जडणघडण : 
यातील रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास प्रथम चपमान (Chapman) या शास्त्रज्ञाने १९३० मध्ये केला. स्ट्रॅटोस्फियरमध्ये ओझोन दोन पायऱ्यामध्ये तयार होतो. पहिल्या पायरीत एका ऑक्सिजन रेणूचे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे विभाजन होऊन २ अणू तयार होतात. अशा अणूला नवजात अणू म्हणतात. दुसऱ्या पायरीत हे दोन नवजात अणू दोन ऑक्सिजनच्या रेणूबरोबर जोडले जातात व दोन ओझोनचे रेणू तयार होतात . या पायऱ्या खाली दाखवल्या आहेत. 
 
O2 ------------> 2[O] 
 
2O2 + 2[O] -----------> 2O3
 
​जसा ओझोन तयार होत असतो तसाच त्याचा ऱ्हास अतिनील किरणांमुळे होता असतो. 
 
O3 -----------> 02 + [O]
 परंतु मानव-निर्मित रसायनांमुळेसुद्धा ओझोन नष्ट होतो व त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवले पाहिजे. नाहीतर माणसांना व इतर प्राणी व वनस्पतींना नष्ट होण्याचा धोका आहे. 
 
ओझोन विवर, काय आहे आणि काय होऊ शकेल? 
हवामानातील होणारे बदल ही सध्या अत्यंत महत्त्वाची जागतिक समस्या झाली आहे. अनेक देशांचे शास्त्रज्ञ व राजकारणीसुद्धा यात लक्ष घालत आहे. विशेषतः ओझोनचा थर कसा वाचवायचा हा यक्ष प्रश्न आहे. १९२८ मध्ये क्लोरोफ्लुरोकारबॉन (cholorofluorocarbon) हे रसायन फ्रीजमध्ये वापरण्यासाठी निर्माण केले. त्याचा जसजसा वापर वाढत गेला तसतसे त्याचे हवेतील प्रमाण वाढत गेले. नंतर मेरिओ मोलिना व शेरवूड रोलँड यांनी शोध लावला की (CF2Cl2) हे रसायन अति उच्च अतिनील किरणांच्या साहाय्याने ओझोन रेणूचे विघटन  करतात. हे विघटन थंड हवेत जास्त होते. दक्षिण ध्रुवावरील हवा उत्तर ध्रुवांपेक्षा जास्त थंड असते व म्हणून दक्षिण ध्रुवावर ओझोनला विवर पडले आहे असा तीन ब्रिटिश शास्त्रज्ञ  फार्मन, गार्डिनरी व  शॅन्कलीन यांनी १९८४ मध्ये शोध लावला. अंटार्क्टिकावर पडलेले विवर (Hole)च्या पेक्षा दीडपट मोठे आहे. 
आता स्वाभाविक प्रश्न येतो की, हे विवर असेच वाढत जाणार का? मानवावर भयंकर आपत्ती येणार का? इत्यादी. पण हा धोका सध्या नाकारता येणार नसला तरी एक आशेचा किरण दिसत आहे. काही शास्त्रज्ञाच्या मते हे अंटार्क्टिकवरच विवर २०५० पर्यंत बुजले जाईल. म्हणजे या एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या भागात आपली पृथ्वी सुरक्षित असण्याची शक्यता आहे. थोडक्यात तुम्हा मुलांना हवामानाचा वातावरणाचा अभ्यास व संशोधन करण्याची व आपल्या पृथ्वीवरील प्राणिमात्र व वनस्पतिमात्र वाचवण्याची महान संधी मिळणार आहे. यासाठी आठवीपासून तुम्हाला नेटाने स्वाध्याय करायची सवय बाणवून घ्यायला हवी. 
नुकतेच एका अर्थशास्त्राचे नोबेल विजेत्या मांनसशास्त्रज्ञाने  - प्रा. डॅनियल काहनिमन एक पुस्तक लिहिले आहे, शीर्षक - जलद आणि मंद विचारसरणी. त्याच्या मते मंद विचारसरणीचे काही दूरगामी दृष्टीने फायदे होतात. विज्ञानात नवनिर्मितीच्या दृष्टीने माझ्या मते मंद विचारसरणी जास्त महत्त्वाची असते. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे - Rome was not built in one day - म्हणून सातत्याने स्वतः प्रयत्न करा, यश तुमच्याकडे चालत येईल. 
खाली दिलेली लिंकवर न्यूटन काय म्हणतोय ते नक्की वाचा.
 
- दिलीप साठे