पाढ्याची गंमत

शाळेला सुट्टी असल्यामुळे राधा, अनघा मावशीकडे राहायला आली होती. रोज आमरस आणि मित्र-मैत्रिणींबरोबर भरपूर खेळणं यात वेळ मजेत जात होता.

एके दिवशी दुपारी अनघा मावशीने राधाला सांगितलं की, ती आज पाढ्यांची उजळणी घेणार आहे. शाळा सुरू व्हायला काहीच दिवस राहिले होते. त्यामुळे राधा पण तयार झाली.

राधा म्हणाली, “मावशी, सांग कोणता पाढा म्हणू?”

मावशी म्हणाली, “पूर्ण पाढा म्हणून घेणार नाहीये मी!”

“मग?” राधाचे डोळे उत्सुकतेने लकाकले. “मी, विचारेन तसं तसं सांग!”!

“विचार बरं काय विचारायचं ते. सगळे पाढे पाठ आहेत माझे ३० पर्यंत”

“सांग बरं १३ साते?” राधाने पाढा म्हणायला सुरुवात केली.

“तेरा एके तेरा, तेरा दुने”

“थांब, थांब!, असं नाही काही! एकदम सांग तेरा साते किती?”

“असं एकदम कसं सांगायचं?”

“नेहमीप्रमाणे काहीतरी युक्ती असेल तुझ्याकडे तर सांग की!”

युक्ती आहे ना! त्या युक्तीचं नाव आहे आडवे पाढे!” हो! आडवे पाढे”

“काहीतरी अवघडच दिसते आहे ही युक्ती!”

“नाही गं राधा! सोप्पयं अगदी!”

“आडवे पाढे म्हणजे ऐकक पाढा न म्हणता प्रत्येक पाढ्याची एकेक ओळ म्हणायची म्हणजे,

बे चोक आठ

तीन चोक बारा

चार चोक सोळा

पाच चोक वीस

सहा चोक चोवीस

याप्रमाणे ३० चोक वीसासेपर्यंत.”

“अय्या!, किती मस्त आडवे पाढे”, राधाला खूपच गमंत वाटली.

“आता शाळा सुरू होईपर्यंत आडव्या पाढ्यांचा सराव करायचा रोज.”

अनघा मावशी म्हणाली, “हो, मावशी मग मला पण गुणाकाराची उदाहरण करता येतील पटापट.”

“राधा, ३० च्या पुढचे पाढे येतात का तुला?”

“नाही गं मावशी, अंकलिपीत, पण ३० पर्यंतच तर असतात.”

“हो, पण आपण तयार करू शकतो कोणताही पाढा!”

“अगं मावशी, किती वेळ लागेल त्याला. किती गुणाकार करावे लागतील!”

“गुणाकार न करता तयार करत येतो पाढा.”

अनघा मावशीने, ३ चा पाढा तयार करून दाखवला खालीप्रमाणे.

३७युक्ती ३७

६१४(६+१) ४७४

९२१(९+२) ११११

१२२८(१२+२) ८१४८

१५३५(१५+३) ५१८५

१८४२(१८+४) २२२२

२१४९(२१+४) ९२५९

२४५६(२४+५) ६२९६

२७६३(२७+६) ३३३३

३०७०(३०+७) ०३७०

“हा बघ झाला ३७ चा पाढा तयार.”

“अय्या किती सोप्पं! मी करू का एक पाढा?”

“कर की स्वतः करून बघितलं की समजतं.”

राधाने ४६ चा पाढा तयार केला.

४६युक्ती४६

८१२(८+१) २९२

१२१८(१२+१) ८१३८

१६२४(१६+२) ४१८४

२०३०(२०+३) ०२३०

२४३६(२४+३) ६२७६

२८४२(२८+४) २३२२

३२४८(३२+४) ८३६८

३६५४(३६+५) ४४१४

४०६०(४०+६) ०४६०

“किती मस्त मावशी!”, राधा खूपच खूश झाली.

“राधा, ९९ पर्यंतचा कोणताही पाढा करता येईल या युक्तीने तुला.”

राधाला आता शाळा कधी सुरू होईल, असे झाले होते. सर्व मित्र मैत्रिणींनी ही युक्ती दाखवून तिला चकीत करायचे ठरवले होते तिने.

  • -शुभांगी पुरोहित

-[email protected]