अंतरंगातील मी

दिंनाक: 30 Jun 2017 14:01:38


 मी कोण आहे? मी कसा/कशी आहे? मी कोणत्या क्षेत्रात काम करू शकते/शकतो? माझ्या क्षमता कोणत्या? हे ‘मी’विषयीचे प्रश्न सर्वांनाच पडत असतात. 

फक्त पौगंडावस्थेत या सगळ्या प्रश्नांची तीव्रता अधिक असते. त्या वेळी याची उत्तरे मिळाली नाहीत, तर मनाची चलबिचल होण्याची शक्यता जास्त असते आणि याच काळात करिअर विचार सुरू होतो. ९वी, १०वी हा करिअर ठरवण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. आणि तो करिअरच्या दृष्टीने गोंधळ निर्माण करणाराही असतो. हा गोंधळ कमी करण्यासाठी आणि करिअरची दिशा शोधण्यास मदत करण्यासाठी या वयातील विद्यार्थ्यासाठी 'शिक्षणविवेक'ने आयोजित केली आहे, 'अंतरंगातील मी' ही कार्यशाळा.

या वयात जर विद्यार्थ्याला आपल्या करिअरचा अंदाज आला, तर तो मनापासून तयारी करून आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो. फक्त या टप्प्यावर त्याच्या मनातल्या शंकांना, त्याच्या प्रश्नांना त्यांना समजतील त्यांना पटतील अशी उत्तरं, त्याच्या पातळीवर येऊन देता आली तर त्यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा निश्चित मिळेल.    

पाल्य आणि पालकांसाठीचा हा उपक्रम.

या उपक्रमात पालकांचं काय काम?, असा प्रश्न मनात नक्कीच येईल. पण त्याचं उत्तरही आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारून पाहिला, तर लगेच मिळेल. पाल्यांचा करिअर ठरवण्यात आपला सहभाग  महत्त्वाचा असतो. आपल्या आपल्या पाल्याकडून खूप अपेक्षा असतात. त्यांनी त्या पूर्ण कराव्यात असंही वाटत असतं. पण त्याच वेळेला आजचे पालक सजगही झालेले आहेत. पालकांमध्ये आलेली ही सजगता आपल्या पाल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते. त्या सजगतेला करिअरमधल्या ज्ञानाची साथ मिळाली तर तुमच्यात आयुष्यच चित्र खूप वेगळं आणि आनंददायी असेल.  

कार्यशाळेचे स्वरूप :   

कार्यशाळेत पाल्यांना त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या मनात करिअर म्हणजे काय आहे ह्या सगळ्याची चाचपणी करत त्यातल्या समजगैरसमजांवर चर्चा होते. त्यांच्या क्षमता चाचपडून पाहायला त्यांना एक संधी मिळते. त्यासाठी विविध खेळ घेतले जातात. त्यांच्या मनातल्या स्वप्नांचा त्यांच्या क्षमतांशी मेळ घालता येईल असा विचार या खेळांतून दिला जातो? त्यांचे भावविश्व जपत त्यांची स्वप्ने करिअरमध्ये रूपांतरीत होतील का? बहुविध बुद्धिमत्ता समजावून सांगून त्यातल्या त्यांच्या क्षमता कोणत्या आहेत?  त्या क्षमता करिअरसाठी पुरेशा आहेत का? त्यांना हवी असणारी क्षेत्रे कुठे आणि कशी उपलब्ध आहेत? त्यासाठी कोणत्या क्षमता विकसित करायला हव्या? त्यांच्या आवडी आणि स्वप्नवत करिअर यांचा मेळ प्रत्यक्ष लागतो का? ही सगळी चाचपणी प्रक्रिया कार्यशाळेत होते.

या कार्यशाळेत पालक म्हणून तुमचा सहभाग केवळ 3 तास (भोजनोत्तर) असेल. या सत्रात पालकांना बहुविध बुद्धिमत्तेची माहिती दिली जाते.  

यासाठी दोन अनुभवी समुपदेशक असतात.

कार्यशाळेचा परिणाम : 

मुलं ‘स्व’निरीक्षण करू लागतात. 

चर्चा, विविध खेळ, भाषण, गप्पा, पालक- पाल्य संवाद अशा विविध पद्धतींमधून कार्यशाळा खेळीमेळीचे वातावरणात निर्माण होते. त्यातून पालक आणि पाल्य यांच्यात करिअरविषयी मनमोकळा संवाद घडून येतो. 

संपूर्ण दिवसाच्या या कार्यशाळेत मुले आपल्या मनातले सांगतात, मन मोकळे करतात आणि त्याचा फायदा त्यांच्या क्षमता ओळखून त्यावर काम करण्यात होतो. करिअरसाठी त्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाते.

 

खरं सांगायचं तर करिअरविषयक माहिती खूप ठिकाणी उपलब्ध असते. पण ती आपल्या पाल्याला हव्या त्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी, त्याला आपण विचाराला प्रवृत्त करायाला हवं ह्या पालकांच्या अपेक्षा "अंतरंगातील मी"मध्ये पूर्ण होण्यास मदत होते. 

जोपर्यंत आपल्याला ‘स्व’चा, आपल्यातल्या ‘मी’चा शोध लागत नाही, तोपर्यंत आपली निर्णय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या कार्यशाळेला नक्की या !!!

 त्वरित ०२०-४४७०१२९ वर नोंदणी करा. 

-    [email protected]