मुलांसाठी छोटीशी गंमत 

 

उद्दिष्टे/कौशल्य : नेत्र-हस्त समन्वय, कारक कौशल्ये फाइन मोटार स्किल्स

निरीक्षण क्षमता, लिखाण पूर्व तयारी.

जाणून घेऊ या, यावरील कृतीविषयी...

आपण सर्व जण खूपदा अशी चित्रे बनवतो, रंगवतो, मार्ग शोधतो, शब्दशोध, चित्रांची वर्गवारी करतो. यांंसारख्या खूप अॅक्टिव्हिटीज करतो व सोडून देतो. परंतु त्यामागे खूप महत्त्वाच्या संकल्पना दडलेल्या असतात, त्याविषयी थोडे माहीत करून घेऊ. (वयोगट 3+ ते 7 वर्षेसाठी)

‘‘ठिपके जोडा’’ या कृतीमुळे लहान मुलांमधील ‘नेत्र-हस्त समन्वय’ साधण्यास मदत होते, यालाच आपण ‘दृक्-कारक समन्वय’ (visual motor coordination) असेही म्हणू शकतो. शालेय समुपदेशक म्हणून खूपदा पालक माझ्याकडे मुलांच्या तक्रारी घेऊन येतात, जसे पेन्सिल  नीट पकडत नाही, नीट रंगवता येत नाही, लिहिता येत नाही, गिरवता येत नाही. साधा बॉल पकडू शकत नाही. फळ्यावरचे सोप्पे चित्रही काढता येत नाही इ. अशा वेळेस मुलांस काही शारीरिक व्यंग किंवा दृष्टीस तक्रार नाही ना?, तसेच अध्ययन-अक्षमतेसारखे काही नाही ना याची खात्री करून झाल्यावर मी पालकांना दृक्-कारक समन्वयाबद्दल समजावून सांगते. प्रामुख्याने जन्मापासून आपण विविध प्रकारच्या हालचाली करत असतो, त्या 3 प्रकारच्या असतात.

     1) ग्रॉस मोटार स्किल्स gross motor skills

     2) समतोल-समन्वय कौशल्य coordination skills 

     3) सूक्ष्मकारक हालचाली fine motor skills 

1) ग्रॉस मोटार स्किल्स: यामध्ये प्रामुख्याने बॉल फेकणे, योग्य दिशेने तो झेलणे/भिरकावणे, पायाने बॉल मारणे, बॅट-बॉलच्या दिशेने भिरकावणे. उड्या मारणे, सायकल चालवणे, समतोल राखणे, चालताना योग्य दिशेने पळणे यांसारख्या अनेक कृतींचा समावेश होतो.

2) फाइन मोटार स्किल्स: लिखाण, हस्ताक्षर, बटण लावणे, लेस बांधणे, चित्र रंगवणे, प्रामुख्याने मनगट, बोटांच्या हालचाली, पझल पिसेस खेळणे, मणी ओवणे, ब्लॉक्स खेळणे.

3) समतोल-समन्वय कौशल्य : दृष्टी स्थिर करून योग्य ती कृती करणे. चित्राच्या र्जीींश्रळपशच्या आत रंगवणे, ठिपके जोडणे, लिहिणे इतर.

पण नेमके अशा काही कृती करताना मुलांना अडचणी येत असतील तर मुलांकडून खालील ‘कृती’ करून घ्याव्यात. त्याने ‘नेत्र-हस्त समन्वयास’ मदत होऊ शकते.

1) ग्रॉस मोटार स्किल्स:

* प्रथम मोठ्या आकाराच्या बॉलशी खेळणे/झेलणे मग अंतर, आकार  अॅडजस्ट करणे.

* चढणे, पळणे ग्राऊंडवरील अॅक्टिव्हिटीज (कृती)

* जमिनीवर रेषा काढून त्यावर चालणे.

 

2) फाइन मोटार स्किल्स :

* ठिपके जोडून चित्र तयार करणे.

* चित्र रंगवणे प्रथम एकच आकार, नंतर एकात एक मोठा आकार नंतर काठीण्य पातळी वाढवणे.

* पेपर चुरगळणे, फाडणे, चिकटवणे कृती.

* विविध आकार-अक्षरे-आकडे यांना गिरवणे.

* रांगोळी खेळायला देणे, त्यात बोटाने गिरवणे.

* नॉन टॉक्सीक प्ले डो/क्ले खेळायला देणे.

* खेळण्यांशी  पझल्स (2, 3, 4, 5 तुकडे) मग अंदाज घेऊन काठीण्य पातळी वाढवणे. इ.

सध्याचे पालक सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत आहेत. ते मुलांना प्रोत्साहन देऊन आवड निर्माण करू शकतात. त्यासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन मुलांच्या कुवतीनुसार त्यांना प्रशिक्षण देऊ शकतात. या सर्व गोष्टींसाठी वयोमानानुसार मेंदूची कार्यक्षमता, दृष्टीचा विकास व शरीराचा समतोल आत्यंतिक महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने आपण आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करू शकतो. जगाशी स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या आवडीनुसार या वयोगटातील वाचन, लेखन, अंकवाचन ही पूर्व-कौशल्ये आत्मसात केल्यास मुलांना त्याची मदत होऊ शकते.

 - मधुरा कोरडे 

[email protected]