सुट्टी – निसर्गाची मैत्री
दिंनाक: 13 May 2017 16:26:41 |

सुट्टी म्हणजे आनंद! कौतुक मौजमजा! असे आपल्या मनात असते. मौजमजेच्या नेहमीच्या कल्पना सोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि त्याच्यात रमलो की, आपल्याला किती वेगवेगळे खेळ सुचतात... आणि त्यातून आगळाच आनंद प्राप्त होतो.
गुरुदेव रवीन्द्रनाथांनी सुट्टी म्हणजे निसर्गाचा सहवास असे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेली सुट्टी (बांगला भाषेत ‘छुट्टी’) या कवितेतून विलक्षण निसर्गाच्या मैत्रीची ओळख करून घेऊ या.
प्रथम मूळ बंगाली कविता दिली आहे आणि त्याखाली मराठीतून अनुवाद लिहिला आहे.
मेघेर कोले रोद हेसे छे,
बादल गेले टूटी,
आहा हाहा हा.
आज आमादेर छुटी हो भाई.
आज आमादेर छुटि.
की करि आज भेबे ना पाई,
पथ हारिये कोण बने जाई,
कोन माठे ये छुटे बेडाई सकल छेले जूटी,
आहा हाहा हा ||१||
केया- पातार नौका गंडे साजिये देबो फुले.
तालदिघिते भासिये देबो,
चलबे दूले दूले.
राखाल छेलेर संगे धेनू,
चरबी आज बाजिये बेणू.
माखबो गाये फुलेर रेणू चाँपार बने लूटी,
आहा हा हा ||२||
शब्दार्थ:
रोद = प्रकाश, उन भेबे= विर करणे, सुचणे
माठ= मैदान, माळरान केया= केवडा, केतकी
तालदिघि= ताल सरोवर दूले दूले = डुलत
राखाल =गुराखी, गोपाल बेणू= बासरी
गाये= अंगावर चाँपा= चंपक, चांफा
फुलेर रेणू= फुलांचे पराग
या कवितेचा मराठी अनुवाद बंगाली भाषा शिक्षिका अपर्णा झा यांनी केला आहे.
मराठीतून अनुवाद ---
आकाश मंडपी प्रकाश हासे,
पाऊस गेला दुरी.
आज आम्हाला सुट्टी बाबा,
आज आम्हाला सुट्टी
आहा हाहा हा हा हा --
काय करू आज सुचेना काही
पथ हरवून कोण्या वनी जाऊ?
कुठे माळावर फिरत राहू,
जमून सारे साथी
आहा हा हा हा.
केतकी पानाची नौका करू
सजवू तिला फुलात
ताल सरोवरी सोडून देऊ जाई डुलत डुलत
गोपाळांच्या संगे धेनू
चरवू वाजवून वेणू
माखू अंगा पुष्परेणू,
चंपकवनी लोळू
आ हा हा हा हा ||२||
केवळ निसर्गाचा सहवास, त्यातून मिळणारा आनंद आणि निसर्गाचं एक विलक्षण लोभस रूप ही कविता आपल्याला दाखवते. सुट्टीचा असा सामुहिक अनुभव आजकाल आपण घेतच नाही. त्यामुळे आपल्या निसर्गविषयक आणि पर्यायाने समाजविषयक जाणीव प्रेरितही होत नाहीत. त्या प्रेरित करण्याचे काम ही कविता नेमकेपणाने करते आहे. सुट्टीत करायचं काय हा प्रश्नच या कवितेत दिसत नाही, तर सुट्टी खूप सुंदर असते आणि ती अशीच सुंदर आठवणी देणारी घालवायची असते असा संदेश मात्र आजच्या पिढीला मिळतो आहे. आयुष्य समृद्ध करता येणारी, मन प्रसन्न करणारी आणि सुखद असणारी कवितेतली सुट्टी ही मोहक आहे. आजच्या मुलांनी अशी सुट्टी एन्जॉय केली तर या कवितेचं सार्थक होईल नाही?
गुरू रवींद्रच्या या मूल कवितेतली गेयता अनुवादातही अगदी चपखल आली आहे. त्यातला भावार्थही मनाला प्रसन्न करणारा आहे. मुळातली आणि अनुवादातली ही मनोहर सुट्टी पालकांनी आपल्या पाल्यांसोबत घालवली तर काय धमाल येईल नाही?
-रेखा मुळे