गंमत विशेषणांची
दिंनाक: 03 Mar 2017 14:00:11 |

----------------------------------------------------------------
मुलं प्रयोगातून खूप आनंदाने आणि उत्साहाने शिकू शकतात. त्यांना सारखं एकच काम करायला आवडत नाही. नेहमीच त्यांना नवनवीन खाऊ हवा असतो. तो देणे हीच खरी प्रयोगशील शिक्षकाची कसोटी असते. हा नवनवीन खाऊ आधी शिक्षकाला तयार करावा लागतो.
अशीच एकदा मी इ. ४ थीच्या वर्गात विशेषण शिकवणार होते. आधी मी मुलांना विशेषण म्हणजे काय? हे सांगितलं. आणि वर्गातल्या १ क्रमांकाच्या विद्यार्थ्याला उभे राहायला सांगून बाकीच्या मुलांना तो कसा वाटतो? असे विचारले. त्या वेळी मुलांनी एक एक करत जवळजवळ ३० विशेषण सांगितली. आयत्या वेळी मुलांनी सांगितलेली विशेषणं खाली दिली आहेत.
१) हुशार,
२) गुबगुबीत,
३) सुंदर,
४) छोटा,
५) शांत,
६) गोड
, ७) बडबडी,
८) एकपाठी,
९) हसरी,
१०) गोरी,
११) खोडकर,
१२) उंच,
१३) अष्टपैलू,
१४) लाजरी,
१५) सर्जनशील,
१६) चतुर,
१७) सुशील,
१८) विनोदी,
१९) झोपाळू,
२०) गोजिरी,
२१) मस्तीखोर,
२२) बुद्धिमान,
२३) प्रेमळ,
२४) दयाळू,
२५) पहिलवान,
२६) विश्वासू,
२७) गोंडस,
२८) सहनशील,
२९) चांगला,
३०) मायाळू.
मुलांच्या सर्जनशीलतेला, त्यांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला वाव दिला तर त्यांच्या आनंददायी शिक्षणाला चालना मिळते. त्यांचा शिक्षणातला सहभाग नेमेकपणाने वाढतो, याचे उत्तम उदहारण म्हणून आपल्यला ह्याकडे पाहता येईल.
- प्रतिमा पाठक