पालक म्हणून घडताना ... या कार्यशाळेत पालक सहभागी होताना

 

 

पालक म्हणून घडताना ... कार्यशाळा

 

 

 

‘पालक म्हणून घडताना ...’ ही शिक्षणविवेक आयोजित कार्यशाळा रविवार, दि. ५ फेब्रुवारी२०१७ रोजी पार पडली. या कार्यशाळेची सुरुवात ॐकाराने झाली. ध्यानधारणेने सुरुवात झालेल्या या कार्यशाळेत प्रत्येक पालकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले.

पालकत्वाची भूमिका बजावताना प्रत्येकाच्या मनात ‘पालक म्हणून मी कसे वागायला हवे’ हा संभ्रम होता. या संभ्रमातूनही या सगळ्यांनी ‘पालक-मूल नाते’ आपआपल्यापरीने सांगण्याचा प्रयत्न केला. मूल वाढवण्याच्या त्यांचा अनुभवनांना मुक्त व्यासपीठ मिळाल्यामुळे आपसूकपणे प्रत्येकाच्या समस्यांनाही मोकळी वाट मिळाली.

कार्यशाळेत घेतल्या गेलेल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हीटीजमुळे पालकांचा सहभाग सक्रीय झाला. वेगवेगळे खेळ खेळताना पालकांच्या लक्षात आले की, मुलांबरोबर आपल्याला असे खेळ खेळता येतील.

पालकांचा अभिप्राय:

  • कार्यशाळा उत्तम होती, पालक म्हणून आपण मुलांशी कशा पद्धतीने वागतो, याबद्दलचे आत्मपरीक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन मिळाले. उपयुक्तअसणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स मिळाल्या.
  • कार्यशाळेत येऊन खूप छान वाटले. स्वतःला काही प्रश्न पडले, त्यातून उत्तरे मिळत गेली. पालक म्हणून आपण कसे असावे हे समजले.