रानडे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका वर्षा जोशी, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ, अर्चना कुडतरकर, शिक्षण प्रतिनिधी शिल्पा पराडकर मंचावर
रानडे बालक मंदिर मधील पालक 
स्मिता पाटील-वळसंगकर बोलताना  

 

रानडे बालक मंदिर व 'शिक्षणविवेक' यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक २५ जानेवारी रोजी 'सजग पालकत्व' या विषयावर  व्याख्यान झाले. पालकांचे अभ्यासमंडळ चालवणाऱ्या आणि पत्रकार  म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या  स्मिता पाटील-वळसंगकर यांनी यावेळी पालकांना मार्गदर्शन केले. 'स्वानुभव आणि मुलांच्या वाढीचे टप्पे' याविषयी बोलताना त्यांनी पालकांना अनेक साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या. हावभावपूर्ण गीताने व्याख्यान संपले. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जोशी आणि शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षणविवेक शिक्षक प्रतिनिधी शिल्पा पराडकर यांनी केले.