राधा आज खूप उत्सुकतेने अनघा मावशीची वाट बघत होती.तिने दाखवलेली दोनच्या पाढ्याची गंमत तिने, तिच्या मित्र-मैत्रिणींना; पण दाखवली होती.आईला तीनचा पाढा पाठ करून म्हणून दाखवला आणि तिची शाब्बासकी पण मिळवली होती.

दारावरची बेल वाजली तशी धावत जाऊन राधाने दर उघडलं.”मावशी आली,मावशी आली.”

“राधाराणी खुश दिसतीये. आज काय विशेष?”अनघाने राधाला जवळ घेत विचारलं.

“मावशी,तीनचा पाढा पाठ झाला माझा आणि दोनच्या पाढ्याची गंमत मी वर्गात सर्वांना दाखवली.मावशी आज चारचा पाढा करू का मी तयार?”

राधाने झटकन वही-पेन काढलं आणि बेरजा मांडायला सुरुवात केली.

4+4 =8, 4+4+4 =12,------------

सर्व पाढा तयार झाल्यावर, तिने तो व्यवस्थित लिहून काढला.

“राधा, पाढा कसा तयार होतो ते छान समजलंय तुला! आता तुला पाढ्यांची अजून एक गंमत दाखवणार आहे आज! त्या गमतीमुळे पुढचे पाढे पण पटपट तयार करता येतील तुला.”

आज आणखी काहीतरी नवीन कळणार म्हणून राधाचे टप्पोरे डोळे आणखीनच मोठे झाले.

“राधा, दोनचा पाढा लिही पाहू दोन वेळा आणि तो पण शेजारीशेजारी”.

राधाने दोनचा पाढा दोन वेळा शेजारीशेजारी लिहिला.

मग अनघाने तिसऱ्या columnमध्ये पहिल्या दोन column ची बेरीज लिहिली.

2

2

2+2 = 4

4

4

4+4 = 8

6

6

6+6 = 12

8

8

8+8 = 16

10

10

10+10 = 20

12

12

12+12 = 24

14

14

14+14 = 28

16

16

16+16 = 32

18

18

18+18 = 36

20

20

20+20 = 40

 “अय्यामावशी, हा तर चारचा पाढा तयार झाला.”, राधाला खूपच मजा वाटली.

“आता मला सांग, अजून कोणत्या दोन संख्यांची बेरीज चार येते?”

“1+3 =4”, राधाने झटकन उत्तर दिले.

“म्हणजे मावशी 1 आणि 3 च्या पाढ्यांची बेरीज केली तर?”, राधाने विचारले.

“करून पहा बरं.”

राधाने 1 आणि 3 चा पाढा शेजारीशेजारी लिहिला आणि पुढे बेरीजही मांडली.

1

3

1+3 = 4

2

6

2+6 = 8

3

9

3+9 = 12

4

12

4+12 =16

5

15

5+15 = 20

6

18

6+18 = 24

7

21

7+21 = 28

8

24

8+24 = 32

9

27

9+27 = 36

10

30

10+30 = 40

 

“मावशी,कोणताही पाढा असा तयार करता येईल का गं?”

“हो, येईल की!”

“मी करून बघू अजून एक पाढा?”

‘हो बघ की. कोणता करशील?”

“आता मला दोन आणि तीनचा पाढा पाठ आहे, त्यामुळे आता मला पाचचा पाढा तयार करता येईल.”

“बघ बरं तयार करून.”

 

2

3

2+3 = 5

4

6

4+6 = 10

6

9

6+9 = 15

8

12

8+12 = 20

10

15

10+15 = 25

12

18

12+18 = 30

14

21

14+21 = 35

16

24

16+24 = 40

18

27

18+27 = 45

20

30

20+30 = 50

 

“राधा, आता 4 आणि 5 चा पाढा पाठ करायचा. आता 6,7 आणि 8 चा पाढा कसा तयार करशील सांग पाहू?”

“अगदी सोप्पंय मावशी, 3 चा पाढा दोनदा लिहून बेरीज केली की, झाला 6 चा पाढा! किंवा मावशी, 2 आणि 4 चा पाढा लिहून पण चालेल ना?”

“हो, चालेल की.”

“आणि मावशी,2 आणि 5 चा किंवा 3 आणि 4 चा पाढा लिहून 7 चा पाढा मिळेल.”

“बरोबर,राधा 4 चा पाढा दोन वेळा लिहिलास आणि बेरीज केलीस की 8 चा पाढा तयार! पुढच्या वेळी येईन तेव्हा 9 च्या पाढ्याची एक जादू दाखवेन तुला.आठवण कर मला. पण तोपर्यंत 4 आणि 5 चा पाढा पाठ झाला असेल तरच जादू दाखवेन.”

“बाय बाय मावशी! मी नक्की पाठ करेन पाढे.”

 

 -शुभांगी पुरोहित  

 [email protected]