गणित युक्ती १

दिंनाक: 01 Feb 2017 12:15:49
वजाबाकी करण्याची एक युक्ती  : 
 
 
 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची 
 
उदा:, आपल्याला 1000- 674 वजा करायचे? 
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.
 
म्हणजेच  9-6 =3
            9-7 = 2
            10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 326
 
आपण आणखी एक उदाहरण पाहू.
 
10000 - 4328=?
 
सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2
 
तुमचं उत्तर तयार आहे- 5672
 
उदा:3)
100000-66758
सुरुवातीला
9-6=3
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2
 
स्पर्धा परीक्षेत झटकन  उत्तर काढण्यासाठी ही युक्ती  उपयोगी पडेल.
अनेकवेळा दुकानात / भाजी,फळे, तिकिट घेताना १००, १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत, याचे गणित करायलाही ही युक्ती  उपयोगी होईल. 
 
गणितविषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या युक्त्यांचा अध्यापनात वापर होऊ शकतो. विद्यार्थी संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.