शिक्षणात नाविन्यता असेल तर शिक्षण आनंददायी होते. ज्ञानरचनावादासारख्या पद्धतींचा अवलंब करून अनेक शिक्षक आनंददायी अध्यापन करत आहेत. शिक्षणात वेगवेगळे प्रयोग करून अध्यायन-अध्यापनाची गोडी लावणारे शिक्षक विद्यार्थीप्रिय असतात. पुण्याजवळच्या पुरंदर तालुक्यातल्या सुपे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या छाया भरत जगदाळे यांनी विद्यार्थ्याना इंग्लिश शिकवण्याचा जणू वसा घेतला आहे. डोंगराळ भागातल्या मुलांना इंग्लिश हा विषय आपल्यासाठी नाहीच असं वाटत असताना तो हसत खेळत शिकवणेविद्यार्थ्याकडून परिसरातल्या गोष्टींचा साधन म्हणून वापर करून घेणे,  त्या वस्तूंनाआपल्या क्रियाप्रतिक्रियांना इंग्लिश भाषेत काय म्हणतात ते शब्द मुलांसह शोधणेत्याचा उच्चारस्पेलिंग सांगून वाक्य तयार करायला लावणे ही पद्धत जगदाळेबाईंनी वापरली. यासाठी त्यांनी वर्षभर १ली ते ७वीच्या वर्गात आठवड्यातून एक दिवस हा उपक्रम नियमितपणे राबवला. नुसती घोकंपट्टी न करता परिपाठाच्या वेळी एका विद्यार्थ्याने ५-५  वस्तूंची नावे  व त्यांचे स्पेलिंग सांगायचे. इतर विद्यार्थ्यांनी ते स्पेलिंग लक्षात ठेवून मधल्या सुट्टीत तो शब्दत्याचे स्पेलिंग व त्याबद्दलचे एक वाक्य लिहायचे. यातून शब्द ऐकणेलक्षात ठेवणेवाक्यरचना तयार करणे; याबरोबरच एकमेकांना मदत करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागली. उच्चार स्पष्ट होण्याकडे शिक्षकांचे विशेष लक्ष होते. इयत्ता १ ली ते ७ वीच्या वर्गांचे वाराप्रमाणे वेळापत्रक तयार केले गेले.विद्यार्थी स्वअध्ययनाने शब्दसंग्रह वाढवू लागलेलक्षात ठेवू लागलेवाचू लागलेलिहू लागले. वस्तूंचे नेमके शब्द शोधणेएखाद्या शब्दाचा वाक्यात उपयोग करणेअसा सराव सुरु झाला. विद्यार्थ्यांना  अधिक  प्रोत्साहन देण्यासाठी स्पेलिंग पाठांतर स्पर्धाचित्रवर्णनअन्य भाषिक खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या वस्तूंवर इंग्लिश शब्द लिहून त्याचं प्रदर्शन मांडण्यात आले. या उपक्रमामुळे पूर्वी नावडता असलेला इंग्लिश विषय विद्यार्थ्याचा आवडता झाला. कोशइतर इयत्तांची पुस्तकेइ-लर्निंग यांचाही वापर विद्यार्थी करू लागले. भाषेविषयीचा न्यूनगंड जाऊन मुलांमध्ये इंग्लिश संभाषण कौशल्य आणि सभाधीटपणाही वाढला. सुपे खुर्द या शाळेतील जगदाळेबाईंचा हा उपक्रम आजूबाजूच्या शाळांनी राबवायचे ठरवले. जि.प. शाळा घेरापानवडीजि.प. शाळा पानवडीजि.प. शाळा नाईकवस्ती या शाळांतील ९२ विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. अनुभवातूनकृतीतून ज्ञान मिळाल्यामुळे ज्ञान दीर्घकाळ स्मृतीत टिकण्यास मदत झाली. नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जगदाळेबाईंना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय उपक्रमशील युवा शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

-रुपाली सुरनिस

[email protected]